पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'चोरी-चोरी चुपके चुपके स्थापन झालेले सरकार टिकणार नाही'

नवाब मलिक (Ht photo by Anshuman poyrekar)

अजित पवार यांच्यासोबत असणारे ५ आमदार आमच्या संपर्कात नाहीत. मात्र इतर ६ आमदारांसह अन्य आमदार पक्षासोबत आहेत. त्यामुळे फ्लोअर टेस्टच्या वेळी भाजपचा डाव हाणून पाडू, असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते आणि प्रवक्ता नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे. मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वायबी चव्हाण सेंटरमधील बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 

अजित पवारांची विधीमंडळ पक्षनेतेपदावरुन हकालपट्टी

नवाब मलिक म्हणाले की, पवार साहेबांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत एकमतांनी प्रस्ताव पारित करत अजित पवार यांच्यावर कारवाई करण्यात आली. अजित पवारांचे व्हिप काढण्याचे अधिकार हे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिली. बहुमताच्या चाचणीत भाजला पराभूत करु, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. या बैठकीला जवळपास ४० पेक्षा अधिक आमदार हजर होते. या आमदारांना मुंबईतच ठेवण्यात येणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.  

बाबासाहेबांच्या महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या : काँग्रेस

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापनेसाठी सुरु असलेल्या चढाओढीत सकाळी अभूतपूर्व कलाटणी मिळाली. भाजपचे गटनेते देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपालांनी भाजपला ३० तारखेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत दिली आहे. मात्र दुसरीकडे शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांनी सत्तास्थापनेतील प्रक्रियेवर आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. लवकरात लवकर फ्लोअर टेस्ट घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना कोणत्या वळणावर जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.      
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Shiv Sena NCP Congress government will definitely be formed in Maharashtra Says Nawab Malik