पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उद्धव ठाकरेंकडून आमदारांना मतदार संघात जाण्याचे आदेश

उध्दव ठाकरे

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप-शिवसेना यांच्यातील तणावाच्या वातावरणामुळे राज्यात अखेर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री पदावरुन भाजप-शिवसेना यांच्यातील युती जवळजवळ संपुष्टात आलेली आहे. यासंदर्भात अधिकृत घोषणा कोणत्याही पक्षाने केली नसली तरी दोन्ही पक्षातील संबंध टोकाला गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी एकत्रितपणे सरकार स्थापन करण्याच्या हालचालीही सुरु केल्या आहेत.  

आमच्यात मुख्यमंत्री कोण हे ठरलं होतं, अमित शहांनी सोडले मौन

दरम्यान राज्यातील या सर्व राजकीय घडामोडींमध्ये शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याची ठाम भूमिका घेतलेल्या शिवसेनेने सत्तास्थापनेसाठी आमदारांची फोडाफोडी होऊ नये, याची खबरदारी म्हणून आपल्या आमदारांना मुंबईत एकत्रित ठेवले होते. काही दिवसांपासून रिट्रिट हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या शिवसेनेच्या आमदारांना बुधवारी आपापल्या मतदार संघात जाण्याचे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. राज्यातील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. आमदारांनी आपापल्या मतदार संघात जाऊन यासंदर्भात पाहणी करावी. तसेच १७ तारखेला शिवतिर्थावर यावे, असेही त्यांना सांगण्यात आल्याचे समजते.  

सेना आघाडीसोबत जाऊ नये यासाठी भाजप प्रयत्नशील : पृथ्वीराज

उल्लेखनिय आहे की, १७ नोव्हेंबरला दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी आहे. याच दिवशी शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याने शिवतिर्थावरुन मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी, असे स्वप्न शिवसेनेने पाहिले होते. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील सत्तास्थापनेची प्रक्रिया जलदगतीने होण्याचे चित्र दिसत नाही. परिणामी यासर्व प्रक्रियाला विलंब होण्याची शक्यता आहे. याशिवाय तिन्ही पक्षांची गणिते जुळणार का? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.