पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्यामुळे चर्चा फिस्कटली : उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाच्या मुद्यावरुन भाजप-सेना यांच्यातील युतीत काडीमोड होणार का? असे चित्र निर्माण झाले असताना 'आमचं ठरलंय' असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीमध्ये सर्व काही ठिक असल्याचे दाखवून महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवली. मात्र निकालानंतर भाजप-शिवसेना यांच्यातील मतभेद पुन्हा एकदा समोर येत आहेत.

शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

 त्यामुळेच महायुतीला स्पष्ट बहुमत असताना सरकार स्थापनेचा मुहूर्त लांबला आहे. शिवसेना ठरल्याप्रमाणे ५०-५० फॉर्म्युल्यावर ठाम असताना मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याने भाजप-शिवसेना यांच्यातील चर्चा फिसकटल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. भाजपच्या विधीमंडळ गटनेतेपदी नियुक्त झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्री पद देण्याबाबत कोणतेही आश्वासन दिले नसून मुख्यमंत्री भाजपचाच होईल असे म्हटले होते. वर्षा निवासस्थानी दिवाळी निमित्त पत्रकारांशी अनौपचारिक चर्चेत त्यांनी हे विधान केले होते. या वक्तव्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेतला आहे. 

ज्यांच्या मनात पाप तेच सत्तेसाठी पर्यायांबद्दल बोलतात - संजय राऊत

शिवसेनेच्या नव निर्वाचित आमदारांची आज शिवसेना भवनात बैठक पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आमदारांना संबोधित केले.  मुख्यमंत्र्यांनी औपचारिक गप्पामध्ये ते वक्तव्य करायला नको होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे सत्ता स्थापनेची चर्चा होऊ शकली नाही. अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीत जे ठरले आहे ते करावं, आम्ही स्थिर सरकार देऊ, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपला युतीच्या फॉर्म्युल्याची आठवण करुन दिली आहे.