पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सत्ता स्थापनेतील शिवसेनेच्या भुमिकेबद्दल आदित्य ठाकरेंचे मौन

आदित्य ठाकरे

राज्यातील विधानसभेचा निकालानंतर महायुतीकडे स्पष्ट बहुमत असूनही सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे. शिवसेना ५०-५० च्या फॉर्म्युल्यावर ठाम असून हा पक्ष सद्यस्थितीला राज्यात किंगमेकरच्या भूमिकेत आहे. सत्ता स्थापनेच्या घडामोडीपूर्वी भाजप, राष्ट्रवादीनंतर शिवसेनेने गुरुवारी विधीमंडळाच्या गटनेतेपदाची निवड केली. शिवसेनेच्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर युवा आमदार आदित्य ठाकरे आणि अन्य शिवसेनेच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी शिवसेनेला समर्थन देणाऱ्या नवनिर्वाचित आमदारही त्यांच्या सोबत होते.  

मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्यामुळे चर्चा फिस्कटली : उद्धव ठाकरे

राज्यपालांच्या भेटीनंतर आदित्य ठाकरे म्हणाले की, आम्ही राज्यपालांकडे शेतकरी आणि मच्छिमारांच्या मदतीसंदर्भात मुद्याकडे लक्ष वेधण्याची विनंती केली. अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना फटका बसला आहे. मच्छिमारांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासंदर्भात केंद्र सरकारशी चर्चा करु, असे आश्वासन राज्यपालांनी दिल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

हेरगिरी प्रकरणात व्हॉटसअ‍ॅपने खुलासा द्यावा : केंद्र सरकार

यावेळी त्यांना सत्तास्थापनेसंदर्भातील भूमिकेसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र, आदित्य ठाकरे यांनी यावर मौन बाळगणे पसंत केले. सरकार स्थापनेसंदर्भात मला काहीही बोलायचे नाही. यासंदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे योग्य ती भूमिका मांडतील, असे ते म्हणाले.   
उल्लेखनिय आहे की, विधीमंडळाच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव हा आदित्य ठाकरे यांनी केला होता. आदित्य ठाकरे यांनी नावाचा प्रस्ताव ठेवल्याचा आनंद अधिक आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली होती.