पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'राज्यातील जनतेला नेतृत्व बदलाची अपेक्षा'

राज्यातील निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेचे महत्त्व वाढले आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ५०-५० फॉर्म्युल्यावर ठाम असलेल्या शिवसेनेची ताकद वाढली आहे. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर राष्ट्रवादीच्या तिकीटावर विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेत प्रवेश केला. भाजपने पुर्व विधानसभा मतदार संघातून तिकीट कापल्यानंतर बंडखोरी  करत त्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ बांधून निवडणूक लढवली होती. बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोतोश्रीवर त्यांना शिवबंधन बांधले. सानप यांच्या प्रवेशानंतर शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, बाळासाहेब सानप हे फक्त नाशिक पुरते मर्यादीत नाहीत. ते महाराष्ट्राचे नेते आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे सेनेला नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात बळकटी मिळेल. यावेळी राऊत यांनी सत्ता स्थापनेसाठी शिवसेना आपल्या भुमिकेवर ठाम असल्याचे सांगितले.

भाजपच्या नेतृत्वाखालीच राज्यात महायुतीचं सरकार काम करेल: मुख्यमंत्री

राज्यातील जनतेने दिलेला कौल हा परिवर्तनाचे संकेत देणारा आहे. राज्यातील नेतृत्व आणि राजकारणात जनतेला बदल हवा आहे. सर्वच आमचे मित्र असल्याचे सांगत त्यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीने राज्यात मिळवलेल्या यशाचे कौतुक केले. यंदाच्या निवडणुकीत विरोधी पक्ष ताकदीने उभा राहिला याकडे आपण दुर्लक्ष करुन चालणार नाही, असे संजय राऊत यांनी 'एबीपी माझा' या मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे. 

चुनाभट्टी-बीकेसी उड्डाण पूल खुला करा; नवाब मलिकांचे आंदोलन

भाजपने ५०-५० फॉर्म्युला मान्य केला नाही तर आमच्यासाठी सर्व पर्याय खुले असतील, असे उद्धव ठाकरे यांनी निकालानंतर म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना राज्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याचा मोठा निर्णय घेणार का? अशी चर्चा रंगण्यास सुरुवात झाली होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेचा प्रस्ताव आल्यास याबाबत विचार करु अशी भूमिका मांडली होती. पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी विरोधी बाकावर बसण्याचे भाष्य केल्यानंतर शिवसेना कोणत्या पर्यायाचा विचार करणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावरही काही चिंता करण्याची गरज नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे बारामतीच्या विकासाचा दाखला देत त्यांनी शरद पवारांवर कौतुकाचा वर्षाव केला. प्रक्षप्रमुख योग्यवेळी आमच्याकडील उपलब्ध असलेले पर्याय सर्वांना सांगतील, असे ते म्हणाले.