पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आदित्य ठाकरेंनी दिल्ली दरबारी जाऊन सोनिया गांधींना दिले निमंत्रण

आदित्य ठाकरे आणि सोनिया गांधी

ठाकरे कुटुंबियातील पहिले आमदार आदित्य ठाकरे यांनी दिल्लीतील १० जनपथ येथील सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे उद्या शिवतिर्थावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी त्यांनी सोनिया गांधींची भेट घेतली. सोनिया गांधी यांच्यासोबतची चर्चा सकारात्मक झाली असून त्या शपथविधी सोहळ्याला येतील, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी वर्तवला आहे. 

शपथविधीसाठी सोनिया गांधी, ममता बॅनर्जी आणि केजरीवालांना निमंत्रण

सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर एएनआयला प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, सोनिया गांधीसोबतची भेट सकारात्मक झाली आहे. यावेळी त्यांना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? असा प्रश्न विचारला होता, यावर तुम्हाला उद्या सर्व स्पष्ट दिसेल, असे ते म्हणाले. 

 

दिल्ली दरबारी आलेल्या आदित्य ठाकरे यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची ही त्यांच्या निवासस्थानी जाऊन शपथविधीसाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Shiv Sena leader Aaditya Thackeray meet Congress president Sonia Gandhis residence And invite uddhav thackeray oath ceremony