पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नितीन गडकरी शहाणे राजकारणी वाटत होते, शिवसेनेचा टोला

नितीन गडकरी आणि उद्धव ठाकरे

शिवसेनेने आपल्या 'सामना' या मुखपत्रातून भाजपच्या 'ऑपरेशन लोटस'वर आगपाखड केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याजवळ बहुमत होते तर बहुमताचा आकडा गाठण्यासाठी चांडाळ चौकडीची नियुक्ती 'ऑपरेशन लोटस;च्या नावाखाली का केली असा सवाल केला आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आणि प्रतिष्ठेचा बाजार सत्ताधाऱ्यांनी मांडला आहे. महाराष्ट्राशी ज्यांचे भावनिक नाते नाही, असेच लोक शिवरायांच्या महाराष्ट्राच्या इज्जतीची लक्तरे काढत असल्याचा आरोप त्यांनी केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यांच्यावरही निशाणा साधला. नितीन गडकरी हे एक शहाणे राजकारणी आहेत असा समज होता. तो गैरसमजच ठरला आहे. क्रिकेटच्या खेळाची उपमा त्यांनी या सर्व प्रकारास दिली. त्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी. कितीही ‘फिक्सिंग’ झाले तरी ‘सत्यमेव जयते’ या ब्रीदाचा पराभव जुगाऱ्यांना करता येणार नाही, असा टोला त्यांना लगावला. यावेळी अजित पवारांवरही टीका करण्यात आली.

अजित पवारांना अधिकारच नाहीत, मी तुमची जबाबदारी घेतोय

काय म्हटलंय शिवसेनेनं..

स्वाभिमानाचा आणि प्रतिष्ठेचा बाजार सत्ताधाऱ्यांनी मांडला आहे. महाराष्ट्राशी ज्यांचे भावनिक नाते अजिबात नाही असेच लोक शिवरायांच्या महाराष्ट्राच्या इज्जतीची अशी लक्तरे काढू शकतात. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तीन पक्षांनी मिळून १६२ आमदारांचे पत्र राजभवनात आता सादर केले. हे सर्व आमदार राजभवनात राज्यपालांसमोर उभे राहायला तयार आहेत. इतके स्पष्ट चित्र असताना राज्यपालांनी कोणत्या बहुमताच्या आधारावर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली? या लोकांनी बनावट कागदपत्रे सादर केली व त्यावर घटनेचे रक्षणकर्ते असलेल्या भगतसिंग नामक राज्यपालांनी डोळे झाकून विश्वास ठेवला. मग तीन पक्षांच्या आमदारांनी आपल्या सही-शिक्क्यांनिशी जे पत्र दिले, त्यावर भगतसिंग राज्यपाल महोदयांची काय भूमिका आहे? एक भगतसिंग देशाच्या स्वातंत्र्यासाठी फासावर गेला इतकेच आम्ही जाणतो, तर दुसऱ्या भगतसिंगांच्या सही-शिक्क्याने रात्रीच्या अंधारात लोकशाही व स्वातंत्र्यास वधस्तंभावर चढवले. 

सेनेच्या खासदारांनी घेतली सोनिया गांधींची भेट

आमदारांचे अपहरण करणे व दुसऱ्या राज्यात नेऊन डांबून ठेवणे ही कसली चाणक्य नीती? अजित पवार यांचा सर्व खेळ संपला तेव्हा ‘‘शरद पवार हेच आमचे नेते व मीच राष्ट्रवादीचा पाईक’’ अशी बतावणी त्यांनी केली. ही पराभूताची मानसिकता आहे. शरद पवार यांचे पुतणे म्हणून तुम्ही स्वतःला मिरवत असाल तर आधी बारामतीच्या आमदारकीचा, पक्षातील सर्व पदांचा राजीनामा देऊन तुम्ही तुमचे स्वतंत्र राजकारण करायला हवे होते, पण काकांनी जे कमावले तेच चोरून ‘‘मीच नेता, माझाच पक्ष’’ असे सांगणे हा वेडेपणाचा कळस आहे. शरद पवार यांनी काँग्रेस पक्ष दोनवेळा सोडला व स्वतःचा नवा पक्ष हिमतीने उभा केला. पन्नास वर्षे संसदीय राजकारणात टिकून राहणे सोपे नाही. अनेक उन्हाळे-पावसाळे, वादळे झेलून ते उभे राहिले, पण भाजपने खटले दाखल करताच व ‘ईडी’च्या नावाने ब्लॅकमेल करताच अजित पवार यांनी शरद पवारांच्या राजकीय इस्टेटीलाच सुरुंग लावला व त्यातला माल चोरून ते भाजपच्या वळचणीला गेले. 

आदित्य ठाकरेंच्या या कृतीकडे लक्ष वेधत शेलारांचा सेनेला टोला

फडणवीस यांच्यापाशी बहुमत होते तर मग बहुमताचा आकडा गाठण्यासाठी नव्या चांडाळ चौकडीची नियुक्ती ‘ऑपरेशन लोटस’च्या नावे का केली? ‘‘बाजारात आमदार स्वतःला विकायला तयार आहेत’’ असे त्या चौकडीचा एक सदस्य सरळ बोलतो. हे थैलीशाहीचेच राजकारण आहे. पैशांच्या बॅगा घेऊन ही चौकडी फिरत आहे. ही वेळ संघाचे स्वयंसेवक म्हणवून घेणाऱ्यांवर का यावी?, असा सवाल केला आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:shiv sena criticize on union minister nitin gadkari on maharashtra government formation process