पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'शरद पवार माझ्याबद्दल चुकीची माहिती पसरवताहेत'

भाजपचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे

भाजपचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यासह अन्य काही नेते आपल्या संपर्कात आहेत, असा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा दावा साफ खोटा असल्याचं  एकनाथ खडसे  म्हणाले. 

'शरद पवार माझ्याविषयी खोटी वक्तव्य का करत आहेत हेच मला ठावूक नाही. मी वर्षभरात शरद पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही नेत्याची भेट घेतली नाही. मी कोणाच्याही संपर्कात नाही. पवारांचा दावा खोटा आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावरून निवडणूक लढवण्याचा माझा विचार नाही', असं खडसे यांनी स्पष्ट केलं आहे. 

भाजपतील वाद चव्हाट्यावर, पराग शहांच्या गाडीवर मेहतांच्या समर्थकांचा हल्ला

'शरद पवारांनी माझ्याबद्दल  चुकीची विधानं करणं थांबवावी', अशी टीकाही खडसेंनी केली आहे. भाजपचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यासह अन्य काही नेते आपल्या संपर्कात आहेत असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी ठाण्यामध्ये पत्रकार परिषदेत केला. सत्ताधारी भाजपतील अनेक नेत्यांमध्ये नाराजी आहे. ही नाराजी आताच तयार झालेली नाही. गेल्या अनेक वर्षांपासून हे नेते त्या पक्षात नाराज आहेत आणि आपल्या संपर्कात आहेत, असेही त्यांनी सांगितले.  

PMC बॅंकेच्या तपासात EDची एंट्री, मुंबईत सहा ठिकाणी छापे

भाजपची विधानसभा निवडणुकीसाठी चौथी यादीही जाहीर झाली मात्र यातही खडसे यांचं नाव नव्हतं. शरद पवार यांनी गुरूवारी केलेल्या दाव्यानंतर नाराज खडसे राष्ट्रवादीत जाणार अशा चर्चा राजकीय वर्तुळ आणि माध्यमात रंगू लागल्या.  मात्र मी भाजपशी एकनिष्ट आहे. पक्षासाठी मी कार्य करत राहणार असंही खडसे म्हणाले.

 मेट्रो-३ कारशेडचा मार्ग मोकळा; सर्व याचिका कोर्टाने फेटाळल्या