पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सत्तेसाठी सुपर संडे : सर्वोच्च न्यायालयात सकाळी ११.३० वाजता सुनावणी

देवेंद्र फडणवीस,  भगत सिंह कोश्यारी, अजित पवार

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या माध्यमातून राज्याला नवे सरकार मिळणार असे वाटत असताना शनिवारी सकाळी भाजपचे गटनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने सर्वांच्याच भुवय्या उंचावल्या. राजभवनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार पडलेल्या शपथविधीविरोधात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर रविवारी सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी सुनावणी होणार आहे. 

अजित पवारांची विधीमंडळ पक्षनेतेपदावरुन हकालपट्टी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधीनंतरही राज्यातील सत्तासंघर्षाचा ड्रामा संपलेला नाही. भाजपच्या सत्तास्थापनेविरोधात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने संयुक्तरित्या सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राज्यापालांनी घेतलेला सरकार स्थापनेचा निर्णय हा बेकायदेशीर आहे. हा निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा, अशी मागणी तिन्ही पक्षांनी याचिकेच्या माध्यमातून केली आहे. 

'चोरी-चोरी चुपके चुपके स्थापन झालेले सरकार टिकणार नाही'

तसेच विधानसभेचं अधिवेशन तातडीने बोलावण्यात यावं, असेही या पक्षांचे म्हणणे आहे. लवकरात लवकर विधानसभेचे अधिवेशन व्हावे, अशी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाची इच्छा आहे. बहुमताची प्रक्रिया पार पडत असताना त्याचे व्हिडीओ चित्रिकरण करण्यात यावे, अशी मागणी देखील करण्यात आली आहे. उद्या यासंदर्भात न्यायालयातील घडामोडींवर राज्यतील पुढील राजकीय घडामोडी अवलंबून असतील.