पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सेनेचं दबावतंत्र, संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट

शिवसेनेचे नेते संजय राऊत

मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरू आहे. गेल्या महिन्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत युतीला बहुमत मिळालं मात्र, दोन्ही पक्षाचं घोडं  मुख्यमंत्रीपदावर येऊन अडलं आहे. अशातच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. 

सत्ता स्थापनेतील शिवसेनेच्या भुमिकेबद्दल आदित्य ठाकरेंचे मौन

या भेटीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा नव्या चर्चांना उढाण आलं आहे. शिवसेनेकडून दबावतंत्राचं राजकारण केलं जातंय अशा चर्चा आता पुन्हा जोर धरू लागल्या आहेत. संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. मात्र दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी शरद पवारांची भेट घेतली. या  भेटीत महाराष्ट्राच्या राजकारणावर आम्ही चर्चा केली, असं संजय राऊत एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. 

तर दुसरीकडे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीदेखील गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांनी पवारांची भेट घेतील. शिवसेना-भाजपच्या सत्तेच्या राजकारणात नेमकी काय भूमिका घ्यायची यावर दोन्ही पक्षांमध्ये चर्चा झाली असल्याचे सांगितले जात आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्यामुळे चर्चा फिस्कटली : उद्धव ठाकरे