पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'शिवसेनेच्या नादाला लागून महाराष्ट्रातील काँग्रेसही संपेल'

संजय निरुपम

राज्यात शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेत सहभागी होऊ नये, या भूमिकेवर काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार संजय निरुपम ठाम आहेत. राज्यातील सत्तास्थापनचा गुंता सोडवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. राज्यातील सत्तास्थापनेसंदर्भात दिल्लीमध्ये सकारात्मक चर्चा सुरु असताना संजय निरुपम यांनी ट्विटच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपली भूमिका मांडली आहे.

'सत्ता स्थापनेसंदर्भात शिवसेनेचा संपर्क फक्त काँग्रेस-राष्ट्रवादीशी'

काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पार्टीसोबत (बसपा) जात काँग्रेसने मोठी चूक केली होती. या घटनेनंतर उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस रसातळाला गेली. त्यातून काँग्रेसला आतापर्यंत सावरता आलेल नाही. महाराष्ट्रात आपण पुन्हा हीच चूक करत आहोत, अशा आशयाचे ट्विट संजय निरुपम यांनी केले आहे. शिवसेनेच्या सरकारमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून सामील होणे काँग्रेसला खड्ड्यात गाठण्यासारखे आहे, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. काँग्रेस अध्यक्षांनी दबावात येऊ नये, असा उल्लेखही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये केलाय.  

भाजपला सोडून कोणतेही सरकार टिकणार नाही: सुभाष देशमुख

यापूर्वी देखील त्यांनी शिवसेनेसोबत जाण्याबाबत उघडपणे विरोध दर्शवला होता. राज्यात सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने सत्ता स्थापनेत असमर्थता दर्शवल्यानंतर राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस मिळून सरकार स्थापन होऊ शकते, यासंदर्भातील चर्चा रंगण्यास सुरुवात झाली होती.  शिवसेना-काँग्रेस मिळून स्थिर सरकार महाराष्ट्रात शक्य नाही, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले होते.  काँग्रेसने शिवसेनेला साथ दिली तर भविष्यात काँग्रेसला अडचणींना सामोरे जावे लागेल. त्यामुळेच काँग्रेसने कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेसोबत जाऊ नये, असे ते म्हणाले होते.