पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सलमानचा विश्वासू बॉडीगार्ड 'शेरा'चा शिवसेनेत प्रवेश

शेराचा शिवसेनेत प्रवेश

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा दीर्घकाळापासून बॉडीगार्ड असलेल्या शेरानं शिवसेनेत प्रवेश केला आहे. गुरमीत सिंग उर्फ शेरा सलमानचा विश्वासू बॉडीगार्डपैकी एक आहे. शुक्रवारी मातोश्री निवासस्थानी शेरानं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत  प्रवेश केला. 

विधानसभा निवडणूक : प्रचार तोफा आज थंडावणार, आता वेध मतदानाचे

मागील २२ वर्षांपासून शेरा सलमान खानचा बॉडिगार्ड म्हणून काम करत आहे.  विश्वासू म्हणून ओळखल्या जाणारा शेरा सलमानच्या 'बॉडीगार्ड' चित्रपटाच्या गाण्यातही दिसला होता. 

शरद पवार ट्रेंडिंगमध्ये, अनेकांकडून 'साहेबां'ना सलाम!

शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून 'शेरा'च्या शिवसेना प्रवेशाबाबत माहिती देण्यात आली.