पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोदींच्या सभेसाठी पुण्यात झाडांची कत्तल; वृक्षप्रेमींसह पुणेकर संतप्त

मोदीच्या सभेसाठी जोरदार तयारी

विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या जोरदार प्रचार सभा सुरु आहेत. येत्या १७ ऑक्टोबर रोजी पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. पुण्यातल्या एस. पी. कॉलेजच्या मैदानावर त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी जोरदार तयारी करण्यात आली असून सभेसाठी एस. पी कॉलेज मैदानावर मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करण्यात आली आहे.

भाजपचा 'दुष्काळमुक्त महाराष्ट्र'चा संकल्प

सभेसाठी मैदानावरील २० ते २५ झाडांची कत्तल करण्यात आली आहे.  तर काही झाडं मुळापासून तोडण्यात आली आहेत. मैदानात समोरच्या बाजूला व्यासपीठ उभारण्यात येत आहे. व्यासपीठ उभारण्यात अडचण येत असल्याने ही झाडे कापण्यात आली आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव या झाडांची कत्तल करण्यात आली असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. त्यासाठी परवानगी देखील घेण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. 

उरलेले आयुष्य कोकणाच्या विकासासाठी घालवणार: नारायण राणे

दरम्यान, पुणे महापालिकेच्या परवानगीने ही झाडे कापण्यात आली, असे शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष अॅड. एस. के. जैन यांनी सांगितले. २ झाडे तशीच आहेत. १ झाड पावसामुळे पडले. यात काही चुकीचे नसल्याचेही ते म्हणाले. या वृक्षतोडीमुळे वृक्षप्रेमींसह पुणेकरांमध्ये संतापाची भावना आहे. तर, महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री पुण्यात आले होते. त्यावेळी सिंहगड रस्त्यावरील झाडे तोडण्यात आली होती.