पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आपापसातील भांडणात दोघांचेही नुकसान, भागवतांचे सूचक वक्तव्य

मोहन भागवत

प्रकृतीचा नाश केल्याने आपलाही नाश होईल, हे सर्वांना माहित आहे. पण तरीही प्रकृती नष्ट करण्याची वृती थांबताना दिसत नाही. आपापसातील भांडणामुळे दोघांचे नुकसान आहे, तरीही आमच्यातील भांडखोर वृत्तीला आळा बसत नाही, अशा शब्दांत राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सध्याच्या समाजातील मानसिकतेवर चिंता व्यक्त करत अप्रत्यक्षरित्या राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आहे. नागपूर येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते. 

भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात? शक्य की अशक्य...

स्वार्थ ही वाईट गोष्ट आहे हे माहित असूनही फार कमी लोक त्याचा त्याग करुन पुढे जाण्याचा मार्ग स्वीकारतात. राष्ट्रासह व्यक्तीही याला अपवाद नाही, असेही भागवत यावेळी म्हणाले. या वक्तव्यातून भागवतांनी राज्यात निर्माण झालेल्या सत्ता संघर्षावरुन भाजप-शिवसेना या दोन्ही पक्षांना अप्रत्यक्षरित्या सल्लाच दिला आहे. 

रामदास आठवलेंनी शिवसेनेचे टेन्शन घेऊ नये, संजय राऊतांचा टोला

राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून भाजप-शिवसेना आणि मित्रपक्षांना स्पष्ट बहुमत मिळाले. मात्र मुख्यमंत्री पदाच्या मुद्यावरुन भाजप-शिवसेना यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. भाजप देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन करणार यावर ठाम राहिले. तर दुसरीकडे शिवसेनेने  आमचाच मुख्यमंत्री होणार अशी भूमिका घेतली. परिणामी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू  झाली. सत्तापेच अद्यापही कायम आहे. 

एनडीएतून बाहेर काढणारे तुम्ही कोण?, शिवसेनेचा सवाल

हिंदूत्वाच्या मुद्यावर एकत्रित आलेल्या भाजप-शिवसेना यांच्यातील वाद नागपूरच्या राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या दरबारातून सुटेल अशी चर्चाही रंगली होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी नागपूरमध्ये जाऊन सरसंघचालकांची भेटही घेतली होती. दुसरीकडे शिवसेनेने आपल्या मुद्यावर ठाम राहत काँग्रेस राष्ट्रवादीसोबत एकत्रित सत्तास्थापन करण्याबाबतच्या हालचाली सुरु ठेवल्या. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेमुळे शिवसेनेची धाकधूक वाढली आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: rss chief mohan bhagwat indirectly adivece bjp sena on maharashtra political crisis he says conflict always will loss of both