पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सत्ता नको फक्त विरोधी पक्षनेते पदासाठी बळ द्या!

राज ठाकरे

विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईत प्रचाराचा नारळ फोडला. मुंबईतल्या सांताक्रुझमध्ये राज ठाकरे यांची सभा झाली. यावेळी त्यांनी राज्याला सक्षम विरोधी पक्षाची गरज असल्याचे सांगितले. राज्यात विरोधी पक्ष उरला नाही. या राज्याला सर्वांर्थाने जी गरज आहे ती एका सक्षम, कणखर आणि प्रबळ विरोधी पक्षाची आहे. सत्तेतला आमदार काही करु शकत नाही. विरोधी पक्षातील आमदार त्यांना जाब विचारु शकतो. सरकार नाही तर विरोधी पक्ष या राज्याला न्याय मिळवून देईल, असे मत व्यक्त करत राज ठाकरे यांनी सक्षम विरोधी पक्षाची धुरा माझ्या हाती द्या' असे म्हटले आहे. 

'कमळ म्हणजे सक्ती नाही तर विजयाची खात्री'

पीएमसी बँक घोटाळ्यावर राज ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. पीएमसी बँकेच्या अधिकार पदावर भाजपची माणसं आहेत. भाजपमुळेच पीएमसी बँक बुडाली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सरकारचा मनमानी कारभार सुरु आहे. सरकार आणि न्यायालय संगन मताने चालायला लागल्यावर तुमचा आवज कोण ऐकणार?  असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे. 

महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन होणार: नारायण राणे

दरम्यान, तरुणांना नोकऱ्या लावण्याची आश्वासनं या सरकारने दिली. मात्र कंपन्या बंद होत आहेत. महाराष्ट्र एक नंबरचे राज्य आहे आज ते अदोगतीला जात आहे. आज शेतकरी, तरुण, महिला, विद्यार्थी ओरडत आहे. असलेल्या नोकऱ्या जातात. नसलेल्या नोकऱ्या मिळणार नाही. सर्व शहरांचा बिचका झाला आहे. निवडणुका येतात जाहीरनामे ठोकतात. नको नको ती आश्वासन देतात. दिवसेंदिवस तुमचे आयुष्य हे सरकार बरबाद करत आहे, असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. 

मोदी, फडणवीस सरकार शेतकरीविरोधी : अजित पवार