पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मित्र पक्षाच्या अट्टाहासामुळेच राष्ट्रपती राजवट : मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार

राज्यातील शेतकरी अडचणीत असताना मित्रपक्षाच्या अट्टाहासामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली, असे सांगत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील परिस्थितीला शिवसेनाच जबाबदार असल्याचे म्हटले आहे. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी स्थिर सरकार देण्याबाबत प्रयत्नशील असल्याचेही म्हटले आहे.  

२४ तारखेपासून आजपर्यंत जनादेश स्पष्ट असताना लवकर सत्ता स्थापन व्हावा हीच भाजपची इच्छा होती. पण शिवसेनेने जनादेशाचा अनादर केल्यामुळे राज्यावर राष्ट्रपती राजवटीला सामारे जावे लागत आहे.  शेतकरी अवकाळी पावसाचा सामना करत असताना सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवाच्या प्रश्नावर तोडगा निघावा आणि शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहणार सरकार उभे रहावं ही अपेक्षा होती. पण भाजप सर्वात मोठा पक्ष असतानाही जनादेशाची आदर करण्याची इच्छा असतानाही आम्ही पर्यायाचा शोध घेतला नाही. आमच्या मित्र पक्षाने इतर पर्याय असल्याचे सांगत राज्यात ही परिस्थिती आणली असे सांगत त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.   

काँग्रेस-राष्ट्रवादी सेनेला उल्लू बनतेय : नारायण राणे

कोणत्याही राजकीय पक्षाने राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. काही राजकीय पक्षांनी आम्हाला इतर गटाचा किंवा पक्षाचा पाठिंबा असल्याचे सांगितले असले तरी राज्यपालांसमोर समर्थनाचे पत्र कोणालाही देता आलेले नाही. आमच्याकडे सर्व पर्याय खुले असणारे देखील अपयशी ठरले, अशा शब्दांत नाव न घेता शिवसेनेला टोला लगावला. आम्ही सुद्धा देखील सत्ता स्थापनेसाठी वेळ मागितला होता. पण राज्यपालांनी आम्हालाही वेळ वाढवून दिला नाही, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणे दुर्दैवी : देवेंद्र फडणवीस

काँग्रेस-राष्ट्रवादीने अजूनही शिवसेनेला पाठिंबा दिलेला नाही. मुंबईतील आघाडीच्या बैठकीचा दाखला देत ते म्हणाले की, बैठकीनंतर आघाडीच्या नेत्यांनी शिवसेनेची भेटही घेतलेली नाही. या सर्व परिस्थितीचा आढावा घेत आहोत. आग्रह अट्टाहासामुळे राज्यात लागू झालेल्या राष्ट्रपती राजवटीमध्य भाजप शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे. यासंदर्भातील सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. राज्यात स्थिर सरकार देण्यासंदर्भात प्रयत्नशील आहोत. योग्यवेळी आम्ही आमची भूमिका सर्वासमोर सांगू असेही ते म्हणाले. 

आमचं अजून ठरलेलं नाही, आघाडीने मांडली भूमिका

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Presidents rule is definitely something we did not expect We will try to form a stable government BJP leader Sudhir Mugantiwar