विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यभर मतदान होत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. मात्र राज्यातील अनेक भागामध्ये सुरु असलेल्या पावसामुळे मतदान केंद्राबाहेर नागरिकांची कमी गर्दी पाहायला मिळत आहे. पावसामुळे अनेक जण मतदान करण्यासाठी बाहेर पडले नाहीत. दरम्यान, पुण्यातल्या शिवाजीनगर येथील मतदान केंद्रावर विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. तरी सुध्दा मेणबत्तीच्या सहाय्याने मतदान प्रक्रिया सुरु आहे. या मतदान केंद्राबाहेर नागरिकांची गर्दी झाली आहे.
#MaharashtraAssemblyPolls: Power cut at a polling booth in Pune's Shivaji Nagar; voting underway. pic.twitter.com/DEMcctTE2t
— ANI (@ANI) October 21, 2019
'मतदान करतात त्यांनाच सरकारकडे अपेक्षा मांडण्याचा अधिकार'
पुण्यातल्या शिवाजीनगर येथील मतदान केंद्रावरील वीज पुरवठा अचानक खंडीत झाल्यामुळे निवडणूक कर्मचाऱ्यांची तारंबळ उडाली. मात्र मतदान प्रक्रियेत अडथळा येऊ नये तसंच मतदारांची गैरसोय होऊ नये यासाठी मेणबत्तीच्या सहाय्याने मतदान प्रक्रिया सुरु ठेवली आहे. दरम्यान, राज्यातील अनेक भागामध्ये ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाले आहेत. तर काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्या आहेत त्यामुळे मतदान केंद्राबाहेर नागरिकांची गर्दी झाली असून त्यांचे हाल होत आहे.