पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आदित्य ठाकरे राज्याचे भावी मुख्यमंत्री, वरळीत पोस्टरबाजी

आदित्य ठाकरे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेश माने यांचा  दारूण पराभव करत शिवसेनेच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे  वरळी विधानसभा मतदारसंघातून विजयी ठरले. ठाकरे घराण्यातून पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आदित्य यांनी पहिल्याच निवडणुकीत इतिहास रचला. त्यांच्या विजयानंतर आदित्य ठाकरे यांचे शुभेच्छा फलक वरळीत लावण्यात आले. यात आदित्य ठाकरेंचा राज्याचे भावी मुख्यमंत्री असा केलेला उल्लेख सर्वांचं लक्ष वेधत आहे. 

वारं फिरलंय, पण महायुती म्हणते आमचं ठरलंय !

विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांना ८९ हजार २४८ मतं पडली आहेत. या विजयानंतर  वरळीत आदित्य ठाकरे यांचे शुभेच्छा फलक लावण्यात आले त्यात राज्याचे भावी मुख्यमंत्री  असा उल्लेख करण्यात आला आहे. 

जनतेनं म्हटलंय, माज दाखवाल तर याद राखा, सेनेचा घरचा आहेर

भाजप सत्ता स्थापनेपासून बहुमतांच्या  १४५ आकड्यापासून दूर आहे.  विधानसभा निवडणुकीत १००च्या आसपास जागा आल्यामुळे  सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेची गरज ही भाजपला असणार आहे. काही महिन्यांपूर्वी यावेळी मुख्यमंत्री हा शिवसेनेचा होईल अशी इच्छा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली होती. त्यातून मुख्यमंत्री पदासाठी आदित्य ठाकरेंचही नाव चर्चेत होतं. आदित्य मुख्यमंत्री व्हावा अशी शिवसैनिकांची इच्छा आहे आणि त्यात गैर  ते काय? असं उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत बोलत होते.