गेल्या तीस वर्षांत मुंबईकरांची मतदानाच्या बाबतीत उदासीनताच दिसून आली. २०१९ ची लोकसभा सोडली तर मुंबईत ५०% हून अधिक मतदान झालेलं नाही. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत मुंबईकर मतदानासाठी बाहेर पडतील का हा खरा प्रश्न आहे.
१९९९ ते २००९ या काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मुंबईकरांची उदासीनता दिसून आली. २०१४ साली आलेल्या मोदी लाटेनं चित्रं काहीसं बदललं. २०१४ साली साली लोकसभा निवडणुकीत मुंबईत ५१. ५९%हून अधिक मतदान झालं. तर विधानसभेच्या काळात ५१. २१% मतदान पार पडलं. हे आकडे फारसे समाधानकारक नव्हते.
'शिवसेना-भाजप युती २२० जागांच्याही पुढे जाईल असे वाटत नाही'
काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान हे चित्र काहीसं बदललेलं दिसलं. मुंबईत २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत ५५.२३% मतदान झालं. गेल्या ३० वर्षांतला हा सगळ्यात जास्त मतदानाचा टक्का होता.
त्यामुळे आता विधानसभेला हा रेकॉर्ड मोडणार का? हे पाहण्यासारखं ठरणार आहे. तीन दिवसांची सुट्टी, त्यात पाऊस आणि राजयकीय वातावरण योग्य नसल्यानं कदाचित मतदानाला याचा फटका बसू शकतो असा अंदाज राजकीय विश्लेषक आणि काही कार्यकर्त्यांनी वर्तवला आहे.
राज्यात पुन्हा एकदा युतीचेच सरकार येईल, नितीन गडकरींना विश्वास