पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यात मोदींच्या ९ तर अमित शहांच्या १८ सभा होणार

नरेंद्र मोदी

विधानसभा निवडणुकीला आता अवघे काही दिवस राहिले आहेत. सर्वच पक्षांकडून निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु आहे. सर्व उमेदवारांचे अर्ज दाखल झाल्यानंतर आता प्रचार सभांना सुरुवात झाली आहे. स्टार प्रचारकांच्या यादी जाहीर झाल्या असून खऱ्या अर्थाने प्रचार सुरु झाला आहे. दरम्यान, भाजपच्या प्रचारामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील सहभागी होणार आहेत. मोदींच्या राज्यात ९ तर अमित शहा यांच्या १८ सभा होणार आहेत, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यामध्ये दिली. 

आरे वृक्षतोड प्रकरण SC ने घेतले मनावर, आज होणार सुनावणी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ९ सभापैंकी दोन सभा पश्चिम महाराष्ट्रात होणार आहे. यातील पहिली सभा सातारा तर दुसरी सभा पुण्यात होणार आहे. १७ ऑक्टोबरला एकाच दिवशी या दोन्ही सभा पार पडणार आहेत. मात्र सभेचे ठिकाण अद्याप ठरलेले नव्हते. मात्र आता तारीख ठरल्यामुळे सभेचे ठिकाण देखील लवकच ठरवण्यात येणार आहे. पुण्यामध्ये एकच सभा होत असल्याने पुण्यातील सर्व मतदारसंघातील उमेदवारांसाठी ही सभा असणार आहे, असे देखील चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 

कर्नाटकमध्ये विरोधी पक्ष नेतेपदावरुन काँग्रेसमध्ये गटबाजीचा खेळ