पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इतके दिवस शिवाजी महाराजांचे संस्कार आमच्यासोबत होते आता परिवारही आहे - मोदी

नरेंद्र मोदी

भाजपकडे इतके दिवस छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार होते. पण आता शिवाजी महाराजांचा परिवारही आमच्यासोबत आला आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी साताऱ्यात घेतलेल्या जाहीर सभेत उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले या महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना रेकॉर्डब्रेक मतांनी विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले. आपल्या भाषणात त्यांनी काँग्रेसच्या काळात साताऱ्याचा विकास कसा मागे पडला आणि गेल्या पाच वर्षांच्या काळात त्याला कशी चालना मिळाली याचे सविस्तर विवेचन केले.

काँग्रेस-राष्ट्रवादीने लोकांना गाळात घातले, उदयनराजे कडाडले

भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी साताऱ्यामध्ये नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली. या सभेमध्ये त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर कडाडून टीका केली. ते म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीमध्येच फाटाफूट आहे. ते कसे काय महाराष्ट्राला एकसंध ठेवू शकणार. आघाडीतील नेत्यांना फक्त वाटावाटी करून घेण्यात आणि मलई खाण्यातच रस आहे. शेतकऱ्यांचा विचार करण्याचे काम खऱ्या अर्थाने महायुतीने केले आहे. १९९९ पर्यंत युतीचे सरकार होते. त्यानंतर साताऱ्यातील सिंचन प्रकल्पांच्या फाईल दाबून ठेवण्यात आल्या. २०१४ मध्ये पुन्हा आमचे सरकार आल्यावर या फाईल वर काढण्यात आल्या आहेत. आता साताऱ्यामध्ये अनेक विकासकामे सुरू झाली आहेत. कराड - गुहागर चारपदरी मार्गाचे काम, सातारा - कागल सहापदरी मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

'आधी स्वतःचे अपयश पाहा मग आमच्यावर टीका करा'

मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

- आपला उत्साहाने विरोधकांची झोप उडवली आहे. उदयनराजेंचा एक एक शब्द मनापासून होता, असे सांगत त्यांनी राजेंचे कौतुक केले.  
- सातारा माझ्यासाठी गुरुभूमी. खटावमधील लक्ष्मणराव इनामदार माझे गुरुवर्य
- साताऱ्यात येणे माझ्यासाठी तीर्थक्षेत्रासारखेच
- सह्याद्रीतून आजही जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा केशरी ध्वज फडकवत छत्रपती शिवाजी महाराज येताहेत असा भास होतो
- गेल्या पाच वर्षांत भारतीय सेनेला ताकद मिळाली.  काँग्रेस आघाडीला जे निर्णय घेणे जमले नाही ते महायुतीने करुन दाखवले
- राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी घेतलेल्या निर्णयाला विरोधकांनी नेहमी विरोध केला.