पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'जे ५० वर्षांत झालं नाही ते भाजप-सेना युतीनं करुन दाखवलं'

नरेंद्र मोदी

पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करुन पुन्हा सत्तेत येणे फार मुश्किल असते. देशातील राकारणात असा योग आतापर्यंत फार कमी वेळा पाहायला मिळाले आहे. पण महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये जनतेने भाजपवर पुन्हा विश्वास दाखला आहे, असे सांगत महाराष्ट्र आणि हरियाणातील निवडणुकीच्या यशाबद्दल राज्यातील जनतेचे आभार मानले. राज्यात जनतेने पुन्हा भाजप-सेना महायुतीला विश्वास दाखवल्याचाही त्यांनी प्रामुख्याने उल्लेख केला. दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात ते बोलत होते.    

'या' विद्यमान मंत्र्यांचा झाला पराभव

महाराष्ट्र आणि हरियाणाच्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींनी दोन्ही राज्याचे दौरे केले होते. यावेळी महायुतीला एकहाती सत्ता द्या असे आवाहन त्यांनी केले. मात्र, दिग्गज नेत्यांच्या दौऱ्यानंतरही राज्यात भाजपला म्हणावा तसा कौल मिळाला नाही. मात्र मिळालेले यश कमी नाही, असे सांगत मोदींनी पुन्हा जोमाने काम करण्याचा संदेश दिल्लीच्या व्यासपीठावरुन दिला आहे. भाजपला २०१४ पेक्षा कमी जागा मिळाल्या असल्या तरी मतांची टक्केवारी वाढल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. 

मोदींनी एकाच दिवशी दोन उमेदवारांसाठी सभा घेतल्या आणि दोन्ही पडले!

राज्यातील निवडणूक आणि मागील सरकारचा दाखला देत मोदी म्हणाले की,  मागील ५० वर्षांत महाराष्ट्रातील एकही मुख्यमंत्री ५ वर्षांचा कालावधी पूर्ण  करु शकलेला नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना महायुतीने ५ वर्षांचे स्थिर सरकार दिले. यावेळी देखील मोठ्या बहुमताने जनतेने महायुतीला कौल दिला आहे. प्रशासनाचा मोठा अनुभव नसताना देखील जनतेने पक्षावर आणि नव्या नेतृत्वावर विश्वास दाखवला. मुख्यमंत्र्यांवर पाच वर्षांत कोणताही डाग लागला नाही, असा उल्लेख करत त्यांनी देवंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे.