पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सावरकरांच्या मुद्द्यावरून मोदींची विरोधकांवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी विरोधकांवर हल्ला चढविला. याच लोकांनी हिंदुत्ववादी विचारवंत सावरकांना विरोध केला. याच लोकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला. त्यांना भारतरत्न देण्यास अनेक वर्षांचा वेळ घालवला, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

सुप्रीम कोर्टः मुस्लिम पक्षकारांच्या वकिलाने राम मंदिराचा नकाशा फाडला

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा 'संकल्पपत्र' मंगळवारी मुंबईत प्रसिद्ध करण्यात आले. यामध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यासह महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी भाजपवर टीका सुरू केली. त्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी या मुद्द्यावर आपली भूमिका मांडली.

दरम्यान, भाजप केवळ निवडणुकीत मते मिळवण्यासाठी सावरकरांना भारतरत्न देण्याचे आश्वासन देत आहे. लोकसभा निवडणुकीवेळी भाजपने असे आश्वासन का दिले नव्हते, असा प्रश्न काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केला. भाजपचे स्वतःचे नेते सावरकरांच्या विचाराचा किती पुरस्कार करतात, असा प्रश्नही सचिन सावंत यांनी उपस्थित केला. 

कामगार कपातीची चर्चा फोल?, पारले बिस्किटचा नफा १५ टक्क्यांनी वाढला

दुसरीकडे सावरकरांना भारतरत्न देण्याची आमची जुनीच मागणी आहे. सावरकरांनी मराठी भाषेसाठी आणि संस्कृतीसाठीही अमूल्य योगदान दिले असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.