विधानसभा निवडणुकीची तारीख जशी-जशी जवळ येत आहे तशा-तशा सर्वच राजकीय पक्षांच्या जोरदार सभा होत आहे. जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरु आहे. राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेत्यांपासून पदाधिकाऱ्यापर्यंत सर्वच जण प्रचार सभेमध्ये सहभागी झाले आहेत. अशात महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रचाराच्या रिंगणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी देखील उतरले आहेत.
'भारतीय अर्थव्यवस्था एका व्यक्तीच्या मर्जीवर चालू शकत नाही'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज दोन प्रचार सभा होणार आहेत. पहिली सभा जळगावमध्ये होणार आहे. तर मोदींची दुसरी सभा भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे होणार आहेत. याबाबत मोदींनी शनिवारी ट्विट करुन माहिती दिली होती. या सभांदरम्यान मोदी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन्ही सभांसाठी भाजपकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे.
मरिन ड्राईव्ह येथे मॉर्निंग वॉकद्वारे मुख्यमंत्र्यांचा जनतेशी संवाद
दरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या देखील महाराष्ट्रात तीन सभा होणार आहे. राहुल गांधी यांची पहिली सभा लातूर जिल्ह्यातील औसा येथे होणार आहे. दुपारी सव्वा दोनच्या सुमारास त्यांची ही सभा होणार आहे. त्यानंतर मुंबईतील चांदवली आणि धारावी या दोन ठिकाणी त्यांच्या सभा होणार आहे. यावेळी राहुल गांधी नेमके काय बोलणार आहेत हे पाहणे महत्वाचे ठरेल.