पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पिंपरीत ९ बोगस मतदारांना पोलिसांनी घेतले ताब्यात

राज्यभरात आज विधानसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यात मतदान होत आहे. पावसामुळे मतदानावर परिणाम झाला आहे. अशातच पिंपरीमध्ये पोलिसांनी बोगस मतदारांना ताब्यात घेतल्याची घटना समोर आली आहे. पिंपरी विधानसभा मतदार संघातील पिंपरी गावामध्ये पोलिसांनी ही कारवाई केली आहे. याठिकाणी विद्यानिकेतन शाळेतील बुथ क्रमांक ३०३ वर काही परप्रांतीयांनी बोगस ओळखपत्रे दाखवून मतदान केल्याने तणावाचे वातावरण आहे.  

अमरावतीत स्वाभिमानी पक्षाच्या उमेदवारावर हल्ला; गाडी पेटवली

या बोगस मतदारांना शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी पिंपरी पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी ९ बोगस मतदारांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे. मराठी मतदारांच्या नावावर परप्रांतीयांनी मतदान केल्यामुळे ही बाब लक्षात आली. या घटनेमुळे या मतदान केंद्रावर तणावाचे वातावरण आहे. बोगस मतदारांबाबतची तक्रार आमदार गौतम चाबुकस्वार यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे. 

करमाळा मतदारसंघातील मतदान केंद्रावर दोन गटांत हाणामारी