पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'आम्ही विरोधी पक्षात बसावं अशी लोकांची इच्छा'

शरद पवार

आम्ही विरोधी पक्षात बसावं अशी जनतेची इच्छा आहे, आणि लोकांच्या इच्छेचा आम्ही नक्की मान ठेवू, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. पवार यांच्या या नव्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय समीकरणाचे वारे वेगळ्याच दिशेनं वाहू लागेल आहेत. 

शहा राहिले दूर, उद्धव ठाकरेंची शरद पवारांशी फोनवर चर्चा

महाराष्ट्रात युतीला बहुमत मिळाले. मात्र शिवसेना- भाजपची  गाडी सध्या मुख्यमंत्रीपदावर येऊन अडकली आहे. बहुमत मिळूनही अद्यापही राज्यात सरकार स्थापन झालेलं नाही. निकाल लागल्यानंतर आरोप प्रत्यारोपांचा कलगी तुरा रंगला आहे.  अशातच  शिवसेना राष्ट्रवादी, काँग्रेसला बरोबर घेऊन सत्ता स्थापन करू शकते अशाही चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून ऐकायला मिळत आहे.  मात्र या शक्यता शरद पवार यांनी फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेची पुन्हा एकदा कोंडी झाली आहे. 

महायुतीचे नेते मुंबई दरबारात, शरद पवार शेतकऱ्यांच्या दारात

आमच्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. आम्ही विरोधी पक्षाची भूमिका निभवावी असं सामान्य जनतेला वाटत आहे, जनतेच्या इच्छेचा आम्ही मान ठेवू, अत्यंत प्रभावीपणे विरोधी पक्षाची  भूमिका आम्ही निभावू असं शरद पवार नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले. 
जनतेनं युतीला निवडून दिलं आहे, लोकांनी दिलेल्या संधीचा युतीनं उपयोग केला पाहिजे, मात्र सध्या दोन्ही पक्षांचा पोरखेळ सुरू आहे, अशी टीकाही पवार यांनी केली. 

सोनिया गांधींसोबतच्या चर्चेनंतर थोरात म्हणाले...