पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गोपीनाथ मुंडेंनी सुरु केलेले काम पुढे न्यायचंय: पंकजा मुंडे

पंकजा मुंडे

राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरु आहे. आज दसऱ्याच्या निमित्ताने अनेक राजकीय पक्षांनी प्रचाराचा नारळ फोडला. बीड जिल्ह्यातल्या सावरगाव घाट येथे पंकजा मुंडेंनी दसरा मेळाव्याचे आयोजन केले होते. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला. यावेळी इथल्या बंधू-भगिनींना चांगलं भविष्य देण्याचे काम अमित शहांच्या नेतृत्वाखाली करायचे असल्याची इच्छा पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. 

नोकऱ्या जाताहेत, उद्योग बंद पडताहेत हे स्वीकारा- उद्धव ठाकरे

अमित शहा यांनी कलम ३७० हटवून न्याय मिळवून दिला. हे कलम रद्द करुन अमित शहांनी राष्ट्रभक्तीचे नवीन उदाहरण दाखवले असल्याचे मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले. तसंच अमित शहांच्या नतृत्वाखाली सीमोल्लंघन करायचे आहे. तसंच, माणूस तेव्हाच विजयी होतो जेव्हा तो लोकांच्या मतावर नाही तर मनावर राज्य करतो. तसंच, ४ वर्षापूर्वी अहंकाराचा गड उतरुन नवी सुरुवात केली. आयुष्यभर मी तुमची सेवा करेल. शेवटच्या क्षणापर्यंत तुमचा स्वाभिमान टिकवणार आहे.', असे मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले. 

'मन की बात'चे 'मौन की बात' होऊ देऊ नका, शशी थरूर यांचे मोदींना पत्र

दरम्यान, 'भगवानबाबांनी सर्वांना शिक्षणाचा विचार दिला. भगवान बाबांची समाधी ही सामान्य वंचितांसाठी चैत्यभूमी बनली आहे. गोपीनाथ मुंडेनंतर तुम्ही सर्वांनी मला साथ दिली. त्याबद्दल सर्वांचे आभार मानत असल्याचे पंकजा मुंडेंनी सांगितले. तसंच. चार वर्षापूर्वी अहंकाराचा गड अतरुन मी नवीन सुरुवात केली. गोपीनाथ मुंडेंनी सुरु केलेले काम पुढे न्यायचे असल्याचे मत पंकजा मुंडेंनी व्यक्त केले. 

'मन की बात'चे 'मौन की बात' होऊ देऊ नका, शशी थरूर यांचे मोदींना पत्र