पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आमचं सूर्ययान मंत्रालयाच्या ६व्या मजल्यावर सुरक्षित उतरलं: संजय राऊत

संजय राऊत (ANI)

अघोरी प्रयत्न करुनही भाजपला आपला मुख्यमंत्री महाराष्ट्रावर लादता आलेला नाही. देशातील परिवर्तनाची नांदी महाराष्ट्रातून सुरु झाली आहे, असे सांगताना संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर आमचे सूर्ययान मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर व्यवस्थित उतरले आहे. आता ते दिल्लीतही उतरेल त्यावेळी कुणाला आश्चर्य वाटायला नको, असा विश्वासही व्यक्त केला. 

मला सध्या काहीही बोलायचं नाही.., अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

संजय राऊत हे पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, ज्यावेळी मी शिवसेनेचे सूर्ययान मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर उतरेल असे म्हटले होते. त्यावेळी माझी थट्टा करण्यात आली. पण हे सूर्ययान आता व्यवस्थित उतरले आहे. भविष्यात दिल्लीतही ते उतरल्यानंतर आश्चर्य वाटायला नको.

आता उद्धव ठाकरेंचे सरकार असेल आणि मी पक्षाचे काम करेन. चाणक्य नव्हे तर आम्ही लढणारे लोक आहोत, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.

२०१४ मध्ये राष्ट्रवादीचा घेतलेला पाठिंबा लाचारी नव्हती का?,सेनेचा सवाल