पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... आणि शरद पवारांच्या फेसबुक पेजवरील ते वाक्य खरे ठरले!

शरद पवार

विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने ज्या पद्धतीने वातावरण निर्मिती केली होती. तशी परिस्थिती वास्तवात नसल्याचे निकालांवरून स्पष्ट झाले आहे. आमच्यासमोर प्रतिस्पर्धीच नाहीत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत होते. पण प्रत्यक्षात निकालानंतर भाजप आणि शिवसेनेच्या जागा कमी झाल्याचे दिसून आले आहे. तर दुसरीकडे वयोमानाचा विचार न करता महाराष्ट्रात प्रचार करून आपली ताकद दाखवून देणाऱ्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा गेल्या निवडणुकीपेक्षा वाढल्या आहेत. विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर शरद पवार यांच्या फेसबुक पेजवरील कव्हर इमेज बदलण्यात आली होती. या कव्हर इमेजवर एक वाक्य लिहिले आहे. 'दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र झुकत नाही हा इतिहास आहे.' असे ते वाक्य आहे. ते खरे ठरल्याचे निकालांवरून दिसले आहे. ३० सप्टेंबर २०१९ रोजी ही कव्हर इमेज फेसबुकवर प्रसिद्ध करण्यात आली होती.

विधानसभा निवडणुकीत आपली 'कमाल' दाखवणारे चार उमेदवार!

यंदाची विधानसभा निवडणूक अनेक अर्थाने लक्षवेधी ठरली. निवडणुकीमध्ये शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात शाब्दिक युद्ध रंगल्याचे सगळ्यांनीच पाहिले. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या सर्व सभांमधून शरद पवार यांच्यावरच निशाणा साधला. आमच्यासमोर विरोधकच नाहीत. त्यामुळे यावेळी महायुती २२० चा आकडा पार करेल, असे भाजपच्या नेत्यांकडून सांगण्यात येत होते. पण प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. निकालांमध्ये भाजपच्या जागा गेल्यावेळच्या १२२ वरून कमी होऊन १०५ वर आल्या आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेच्या जागाही गेल्या वेळच्या ६६ वरून ५६ पर्यंत कमी झाल्या आहेत. युती करूनही दोघांचे नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. २२० नव्हे तर २०० जागाही या दोघांना मिळून गाठता आलेल्या नाहीत. 

भाजप-शिवसेनेच्या जागा कमी झाल्या असल्या तरी राज्यात पुन्हा युतीचेच सरकार येणार हे स्पष्ट आहे. पण शरद पवार यांनी राज्यात घेतलेल्या प्रचारसभा, त्यांनी उपस्थित केलेले शेतकऱ्यांचे मुद्दे, ग्रामीण भागातील प्रश्न यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा वाढल्या आहेत, असे राजकीय विश्लेषक सांगतात. गेल्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागा मिळाल्या होत्या. त्या यावेळी ५४ पर्यंत वाढल्या आहेत.

हरियाणातील फॉर्म्युल्यानंतर शिवसेनेची 'बार्गेनिंग पॉवर' आणखी वाढली

राज्य सहकारी बँकेतील गैरव्यवहारांप्रकरणी दाखल गुन्ह्यामध्ये सक्तवसुली संचालनालयाने शरद पवार यांच्यावरही गुन्हा दाखल केल्याची माहिती निवडणुकीपूर्वी समोर आली होती. त्यानंतर शरद पवार हे स्वतः चौकशीसाठी मुंबईत सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात जाणार होते. निवडणुकीपूर्वी विरोधकांवर दबाव टाकण्यासाठीच असे खोटे गुन्हे दाखल करण्यात येत असल्याचे विरोधकांनी त्यावेळी म्हटले होते. पण यानंतरही शरद पवार यांनी राज्यात प्रचार करून आपल्या पक्षाच्या जागा वाढवून दाखविल्या. निकाल जाहीर झाल्यानंतर शरद पवार यांनीच मुंबईत पत्रकार परिषदेत सत्ताधारी सांगत होते तशी काही स्थिती महाराष्ट्रात नाही, असे सांगत भाजप-शिवसेनेला टोला मारला होता.