पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मला सध्या काहीही बोलायचं नाही.., अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

अजित पवार

तडकाफडकी भाजपच्या गोटात जात उपमुख्यमंत्रिपदाची अजित पवारांनी शपथ घेतल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर मंगळवारी अचानक राजीनामा देत पुन्हा राष्ट्रवादीच्या गोटात परतले. त्यानंतर आता महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून लांब राहणाऱ्या अजित पवारांना अखेर प्रसारमाध्यमांनी आज गाठलेच. पण मला सध्या काहीही बोलायचे नाही. योग्य वेळी मी बोलेनच. मी राष्ट्रवादीत होतो, राष्ट्रावादीत आहे आणि राष्ट्रवादीतच राहणार असल्याची प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.

२०१४ मध्ये राष्ट्रवादीचा घेतलेला पाठिंबा लाचारी नव्हती का?,सेनेचा सवाल

पवार पुढे म्हणाले की, माझ्याबाबत गैरसमज करण्याचे कारण नव्हते. माझ्याबाबत तिखट-मीठ लावून बातम्या येत होत्या. त्यात तसूभरही तथ्य नव्हते. 

मी नाराज नव्हतोच. मंत्रिमंडळाचे सर्व निर्णय उद्धव ठाकरे घेतील. ते जे जबाबदारी देतील ती स्वीकारु, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

मंगळवारी रात्री 'सिल्व्हर ओक'वर जाऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याबाबत ते म्हणाले की, शरद पवार हे आमचे नेते आहेत. मी त्यांना भेटणारच. आम्ही नेहमी आनंदातच असतो. राजकारण वेगळे, कुटुंब वेगळ्या ठिकाणी, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

हीच ती वेळ! २८ नोव्हेंबरला उद्धव ठाकरे शिवतिर्थावर घेणार शपथ

दरम्यान, विधान भवनात खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांचे स्वागत केले. दोघांनी गळाभेट घेतली.