पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सरकार स्थापण्यासाठी भाजपला आणखी वेळ मिळण्याची शक्यता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Kunal Patil/HT Photo)

निकाल लागून १० दिवस झाल्यानंतरही राज्यातील सत्ता स्थापण्याचा प्रश्न अजून संपलेला नाही. भाजप-शिवसेनेतील सत्ता स्थापण्यासाठीचा संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. येत्या ९ नोव्हेंबरला विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. दरम्यान, राज्यपाल विधानसभेतील सर्वांत मोठ्या पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी आणखी वेळ देऊ शकतात, असे राजकीय विश्लेषक सांगत आहेत. सरकार लवकर स्थापन न झाल्यास राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते, या अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वकत्व्याबाबत तज्ज्ञांमध्ये मतभेद असल्याचेही दिसून आले. 

मी 'सामना'शिवाय दुसरं वृत्तपत्र वाचत नाहीः संजय राऊत

तथापि, राज्यपालांनी सरकार स्थापन करण्यासाठी सर्वांत मोठ्या पक्षाला आणखी वेळ दिला तर त्यांना दोनवेळा बहुमताला सामोरे जाण्यासाठी पुरेसे संख्याबळ जमा करता येईल. प्रथम विधानसभा अध्यक्षांच्या निवडीवेळी आणि नंतर सरकार स्थापन केल्यानंतर बहुमताला त्यांना सामोरे जावे लागेल.

विद्यमान विधानसभा १० नोव्हेंबर २०१४ रोजी अस्तित्वात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री आणि कॅबिनेटने ३१ ऑक्टोबरला शपथ घेतली होती. 

सर्वोच्च न्यायालयाच निवृत्त न्यायाधीश पीबी सावंत यांनी राष्ट्रपती राजवटीची शक्यता फेटाळून लावली. जोपर्यंत राज्यपाल सरकार स्थापण्यासंबंधीच्या सर्व शक्यता पडताळून पाहत नाहीत तोपर्यंत राष्ट्रपती राजवटीची आवश्यकता नाही, असे ते म्हणाले. संविधानाने यासाठी कालमर्यादा निश्चित केलेली नाही. 

प्रदूषणापासून ताज महालाला वाचविण्यासाठी आता हा उपाय

राष्ट्रपती राजवटीची घाई नसल्याचे, न्याय विभागातील एका सूत्राने सांगितले. राज्यपाल सर्वांत मोठ्या पक्षाला सत्ता स्थापण्यासाठी निमंत्रण देऊ शकतात. त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी काही वेळ देतील. कदाचित हा काळ जरा जास्त असू शकतो, असेही या सूत्राने सांगितले.

वर्ष १९९९ मध्येही अशीच परिस्थिती उद्भवली होती. त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या सत्ता वाटपाचे गुऱ्हाळ दीर्घ काळ रेंगाळले होते, याची आठवण सूत्रांनी करुन दिली. 

पक्ष सोडून गेलेले नेते म्हणतात परत येऊ का?: अजित पवार

सध्याच्या परिस्थितीत जर शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मदतीने विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवार उभा केला तर भाजपसमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत मतदान हे गुप्त पद्धतीने होते. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी किती पाठिंबा आहे, यातून स्पष्ट होते. जर भाजपला आपला विधानसभा अध्यक्ष देता आला नाही तर भाजपला हा मोठा धक्का असेल.

गुंडांचा वापर आम्ही कुठं केला ते संजय राऊत यांनी सांगावेः गिरीश महाजन