पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुलुंडमध्ये नाराज पीएमसी बँक खातेधारांनी निवडला 'नोटा' पर्याय

राज्यभरात आज विधानसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे.

पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकेवर निर्बंध लादले. याचा सर्वांधिक फटका बँक खातेधारकांना बसत आहे. बँकेमध्ये पैसे अडकल्यामुळे खातेधारक चिंतेत आहेत. या चिंतेतूनच काही खातेधारकांचा मृत्यू सुध्दा झाला आहे. अशामध्ये मुलुंड येथील पीएमसी बँकेच्या काही नाराज खातेधारकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला, तर काहींनी 'नोटा'चा पर्याय निवडला. 

Maharashtra Exit Polls: पुन्हा महायुतीकडेच सत्तेचा अंदाज

सोमवारी पार पडलेल्या मतदानात मुलुंड येथे मतदानाची टक्केवारी कमी दिसून आली. कारण याठिकाणी पीएमसी बँकेच्या खातेधारकांनी मतदानाकडे पाठ फिरवली तर काहींनी मतदान केले पण 'नोटा' पर्याय निवडला. पीएमसी बँकेवर आरबीआयने निर्बंध लादले. त्यामुळे बँकेत पैसे अडकल्यामुळे चिंतेत आलेल्या मुलुंडमधील भट्टोमल पंजाबी आणि मुरलीधर धर्रा या खातेधारकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पीएमसी बँकेचे खातेधारक संतप्त झाले आहेत. 

राज्यातील मतदानाची टक्केवारी घसरली! 'करवीर'नगरीत सर्वाधिक

मुलुंडमध्ये पीएमसी बँकेचे १५ हजार खातेधारक आहे. या खातेधारकांनी बँकेवर टाकलेल्या निर्बंध हटवण्यात यावे अशी मागणी केली होती. तसंच पीएमसी बँकेविरोधात खातेधारकांचे आंदोलन सुध्दा सुरु आहे. या आंदोलना दरम्यान खातेधारकांनी निवडणुकीकडे पाठ फिरवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काहींनी मतदान केले नाही तर काहींनी नोटाचा पर्याय निवडला. 

अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा