भारतीय अर्थव्यवस्था चिंताजनक स्थितीत असं म्हणणाऱ्या नोबेल पारितोषिक विजेते अभिजित बॅनर्जी यांच्यावर डाव्या विचारांचे असल्याचा ठपका केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी ठेवला आहे. अभिजित यांची डावी विचारसारणी आहे जी यापूर्वीच भारतीयांनी नाकारली आहे त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेबाबतचे त्यांचे विचार गांभीर्यानं घेण्याची गरज नाही असा टोला गोयल यांनी लगावला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर गोयल सध्या महाराष्ट्रात आहेत. यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेविषयी चिंता व्यक्त केली होती.
भाजपवाले इतिहासही बदलतील म्हणून त्यांना सत्तेपासून दूर ठेवा - पवार
माझ्या मते भारतीय अर्थव्यवस्था खूप वाईट स्थितीतून जात आहे. २०१४-१५ ते २०१७-१८ या आर्थिक वर्षांमध्ये शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांची क्रयशक्ती कमी झाली आहे. खूप खूप वर्षांनंतर पहिल्यांदाच असे घडते आहे. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ही धोक्याची घंटा आहे.
र्थव्यवस्थेची स्थिती काय आहे हे कोणत्या आकडेवारीवरून शोधायचे असाही प्रश्न भारतात निर्माण झाला आहे, असं ते म्हणाले. सरकार त्यांच्यासाठी नकारात्मक असलेली आकडेवारी थेटपणे चुकीची असल्याचे सांगते आहे, याकडेही अभिजित यांनी लक्ष वेधले होते.
'राष्ट्रवादीला नॅनोपार्टी केल्याशिवाय थांबणार नाही'
मात्र अभिजित यांचे विचार गांभीर्यानं घेण्याची गरज नसल्याचं गोयल म्हणाले. नोबेल पुरस्कारासाठी मी सर्वप्रथम अभिजित यांचे आभार मानतो. पण तुम्हाला त्यांची मते आणि विचारसारणी माहिती असेलच. ते डाव्या विचारसारणीचे आहेत ही विचारसारणी भारतानं नाकारली आहे असं गोयल म्हणाले.
मेक्सिकोतून ३११ भारतीयांना बेकायदा प्रवेशावरून मायदेशी परत पाठवले