पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यात पुन्हा एकदा युतीचेच सरकार येईल, नितीन गडकरींना विश्वास

नितीन गडकरी यांनी सहकुटूंब मतदान केले

गेल्या पाच वर्षांत केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वामध्ये विकास झाला आहे. तो बघून राज्यातील मतदार पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्त्वाखाली महायुतीला विजयी करतील, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. नितीन गडकरी यांनी सोमवारी सकाळी नागपूरमध्ये सहकुटूंब आपला मतदानाचा अधिकार बजावला. मतदान केल्यानंतर बाहेर आल्यावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Maharashtra Election 2019 Live Updates: अजित पवारांनी सहकुटुंब केले मतदान

नितीन गडकरी म्हणाले, या निवडणुकीत भाजप, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष आणि तर मित्रपक्षांची महायुती नक्की विजय मिळवेल, असा मला विश्वास आहे. नागरिकांना ज्याला हवे त्याला मतदान केले पाहिजे. पण मतदानाचा हक्क नक्की बजावला पाहिजे. 

विधानसभा निवडणूक २०१९: असे शोधा मतदार यादीत नाव, मतदान केंद्र

राज्याच्या काही भागात सध्या पावसाचे वातावरण आहे. गेल्या शनिवारपासून राज्याच्या पश्चिमेकडील भागामध्ये पाऊस पडतो आहे. त्यामुळे मतदान कमी होईल का, असे विचारल्यावर नितीन गडकरी म्हणाले, मला असे वाटत नाही. लोक नक्की मतदान करतील आणि मतदानाची टक्केवारी नक्कीच वाढेल.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:nitin gadkari cast his vote with family says mahayuti will be back in power in maharashtra