पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चार हाडांचा बीएमसी चोर; निलेश राणेंची उध्दव ठाकरेंवर टीका

निलेश राणे

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला माजी खासदार निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. बीएमसीचा चोर असं नाव न घेता निलेश राणे यांनी उध्दव ठाकरें यांच्यावर टीका केली. बुधवारी उध्दव ठाकरे यांची कणकवली येथे सभा झाली. या सभे दरम्यान उध्दव ठाकरे यांनी नारायण राणे आणि त्यांच्या सुपुत्रांवर जोरदार टीका केली होती. उध्दव ठाकरेंच्या या टीकेला निलेश राणे यांनी ट्विटरवरुन उत्तर दिले आहे.

मला सांगा मी काश्मिरला नेतो, '३७०' वरून मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

'चार हाडांचा बीएमसी चोर, आज कोकणात आला होता आणि परत गेला. बाकीचं लवकरच बोलू.' असे ट्विट करत निलेश राणे यांनी उध्दव ठाकरेंवर टीका केली. कणकवली येथे भाजपने नितेश राणे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तर, भाजप-शिवसेनेची युती असताना देखील शिवसेनेने कणकवली येथे नितेश राणेंच्या विरोधात उमेदवार उभा केला आहे. 

भाजप यंत्रणांना हाताशी धरुन विरोधकांना धमकावतेय- अशोक चव्हाण

दरम्यान, कणकवली येथे झालेल्या सभेमध्ये उध्दव ठाकरे यांनी राणे पिता-पुत्रांवर जोरदार टीका केली होती. 'नारायण राणे मातोश्रीच्या मिठाला जागले नाहीत. नारायण राणेंच्या भाजप प्रवेशानंतर, पाठीत वार करणाऱ्या औलादींपासून सावध रहा, असा सल्ला उद्दव ठाकरे यांनी यावेळी भाजपला दिला. जर भाजपने इतर कुणाला उमेदवारी दिली असती तर मी त्याचे समर्थन केले असते, असे त्यांनी यावेळी सांगितले.  

महात्मा गांधींच्या हत्येच्या कटात सावरकरांचा सहभाग

'नारायण राणे ज्या पक्षात जातील त्या पक्षाची वाट लावतील. मान वाकवणारा स्वाभिमान काहीच कामाचा नाही, असे म्हणत उध्दव ठाकरेंनी राणेंच्या स्वाभिमान पक्षावर टीका केली होती. तसंच 'चोर मित्राच्या घरात शिरत असताना मी शांत कसा बसू शकतो. कारण पाठीत वार करणारे माझ्या मित्रपक्षातही नको', अशी टीका उध्दव ठाकरे यांनी केली होती. 

पीएमसी बँक घोटाळा: जॉय थॉमस यांची रवानगी न्यायालयीन