पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'मातोश्री'वर नाही 'वर्षा'वर राहणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे

महाराष्ट्राचे नवे आणि १९ वे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी शपथ घेतली. दरम्यान, लवकरच ते आपले वांद्रे येथील निवासस्थान मातोश्री वरुन मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान वर्षामध्ये स्थलांतरित होणार आहेत. परंतु, यासाठी कोणतीही तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. पण ते तिकडे निश्चितपणे जाणार असल्याचे सांगितले जाते. वर्षा निवासस्थानी एक कार्यालय आणि एक कॉन्फरन्स रुमही आहे. तेथून ते मुख्यमंत्रिपदाचे कामकाज करु शकतील.

महाविकास आघाडीची अग्निपरीक्षा उद्याच

दुसरीकडे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी बंगला रिकामा करण्यास सुरुवात केली आहे. वर्षा निवासस्थानासमोर मुव्हर्स आणि पॅकर्सची वाहने थांबलेली दिसली. उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दुपारी औपचारिकरित्या आपला कार्यभार स्वीकारला. 

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला

याचदरम्यान, दक्षिण मुंबई येथील राज्य सचिवालयात मुख्यमंत्री कार्यालयाच्या बाहेर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची नेमप्लेट लावण्यात आली. शपथ घेतल्यानंतर काही तासांतच त्यांनी आपली पहिली कॅबिनेट बैठक घेतली.

विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे दिलीप वळसे-पाटील

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:new chief minister of maharastra uddhav thackrey to shift from matoshree to cm house varsha soon