पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मी रोहित सुनंदा राजेंद्र पवार शपथ घेतो की...

रोहित पवार (ANI)

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि शरद पवार यांचे नातू रोहित राजेंद्र पवार यांनी नगर जिल्ह्यातील कर्जत मतदारसंघातून तत्कालीन कॅबिनेट मंत्री राम शिंदे यांचा पराभव करत विधानसभेत प्रवेश केला. पहिल्यांदाच आमदार झालेले रोहित पवार यांनी शपथ घेताना आपल्या आईच्या नावाचाही उल्लेख केला. मी रोहित सुनंदा राजेंद्र पवार..अशी सुरुवात करत त्यांनी आपली शपथ घेतली. 

'आमचं सूर्ययान मंत्रालयाच्या ६व्या मजल्यावर सुरक्षित उतरलं'

तत्पूर्वी, प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या परतण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. अजित पवार पुन्हा परतल्याने आनंद झाला असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रवादीचे ते एक प्रमुख नेते आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला काम करायचे असल्याचेही त्यांनी म्हटले. 

विधानभवनात सुप्रिया सुळे-अजित पवारांची गळाभेट

दरम्यान, रोहित पवार यांनी बारामती सोडून कर्जत मतदारसंघात विजय मिळवल्यानंतर राज्यात त्यांचे मोठे कौतुक झाले होते. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी कर्जत मतदारसंघात काम करण्यास सुरुवात केली होती. गेल्या काही वर्षांपासून हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात होता. रोहित पवार यांनी राम शिंदे यांना पराभवाची धूळ चारली होती.

देवेंद्र फडणवीस ठरले सर्वांत कमी काळ पदावर राहिलेले मुख्यमंत्री