पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा; दोघे जण जखमी

खासगी शिकवणीच्या मालकाची हत्या

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सोमवारी मतदान पार पडले. २८८ जागांसाठी झालेल्या या मतदानाला पावसाचा फटका बसला. राज्यात ६०.४३ टक्के मतदान झाले. या मतदान प्रक्रियेवेळी राज्यातील अनेक भागात राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याच्या घटना घडल्या. अहमदनगर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. मतदानाला जाणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चाकू हल्ला केला. या हल्ल्यात भाजपचे दोन्ही कार्यकर्ते जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

राज्यातील मतदानाची टक्केवारी घसरली! 'करवीर'नगरीत सर्वाधिक मतदान

अहमदनगरमधील जामखेड तालुक्यातील बांधखडक या गावात ही घटना घडली आहे. भाजपचे कार्यकर्ते भालेराव वणवे आणि हर्षवर्धन कुंदे हे दोघे मतदानासाठी जात होते. त्याचवेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर चाकू हल्ला केला. यामध्ये भाजपच्या एका कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावर तर दुसऱ्या कार्यकर्त्याच्या हाताला गंभीर जखमी झाली आहे. दोघांना जामखेड रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

Maharashtra Exit Polls: पुन्हा महायुतीकडेच सत्तेचा अंदाज

या घटनेनंतर संतप्त झालेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या गाडीवर दगडफेक करत गाडीचे मोठे नुकसान केले आहे. या राड्याप्रकरणी जामखेड पोलिसांनी कारवाई करत ५ जणांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. 

Maharashtra Election 2019: वेळ संपली, धाकधूक वाढली