पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धनंजय मुंडे म्हणाले की, अजित दादांवरील प्रेम हा वेगळा विषय!

धनंजय मुंडे

मी राष्ट्रवादीचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही विधानसभा निवडणूक लढवली. अजित दादाही आमच्यासोबत होते. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणे हा अजित पवार यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. माझे अजित दादांवर प्रेम हा विषय वेगळा पण अंतिम प्रेम आणि निष्ठा पक्षावर आणि आदरणीय पवार साहेबांवरच अशा शब्दांत धनंजय मुंडे यांनी मरेपर्यंत शरद पवारांसोबत राहिन असे म्हटले आहे. मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये १६२ आमदारांच्या ओळख परेडच्या कार्यक्रमानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.  

 

अजित पवारांना अधिकारच नाहीत, मी तुमची जबाबदारी घेतोय : शरद पवार

राज्यातील सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादीने  शिवसेना आणि काँग्रेससोबत एकत्रित सत्तास्थापनेचा निर्णय अंतिम टप्प्यात असताना शनिवारी राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवारांनी पक्षाला विश्वासात न घेता भाजपसोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हा प्रकार समोर आल्यानंतर धनंजय मुंडेही नॉट रिचेबल होते. त्यामुळे ते देखील अजित पवारांसोबत फुटल्याची चर्चा होती. आमदारांना धनंजय मुंडेच्या बंगल्यावर बोलावण्यात आल्याचेही समोर आले होते.     
यावर धनंजय मुंडे म्हणाले की, मला या गोष्टी माहित नव्हत्या. मी दुपारी एक वाजता उठल्यानंतर मला कळले. पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत जोपर्यंत ते आमच्यासोबत होते तोपर्यंत मी त्यांच्यासोबत होतो. त्यानंतर मी त्यांच्या संपर्कात नाही.

गमावलेला आत्मविश्वास वाढवण्याचा टुकार प्रयत्न: आशिष शेलार

माझ्या बंगल्यावर  ज्यावेळी हा प्रकार घडला त्यावेळी मी तिथे नव्हतो. माझ्या बंगल्यावर कोणा-कोणाला बोलावलं याची मला माहिती नाही. माझा बंगला एवढा सार्वजनिक आहे की काही काळ तो बस स्टँडसारखाही असतो, याची तुम्हालाही माहिती आहे, असे म्हणत त्यांनी अजित पवारांसोबत सध्या कोणतेही संबंध नाहीत असे म्हटले आहे.  आमच्याकडे बहुमत आहे की नाही याबाबत माध्यमांनी जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला होता. यापार्श्वभूमीवर जनतेला आणि आमच्यासोबत असणाऱ्या आमदारांना आत्मविश्वास उंचावण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला. फ्लोअर टेस्टला तुम्हाल हेच चित्र पाहायला मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.