पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शक्तीप्रदर्शन करत रोहित पवारांनी भरला उमेदवारी अर्ज

रोहित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी गुरुवारी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. भाजपचे नेते आणि महाराष्ट्राचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांचा हा मतदार संघ आहे. त्यामुळे रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यामध्ये लढत होणार आहे. 

नितेश राणेंनी भाजपमध्ये केला प्रवेश; उमेदवारीवर झाले शिक्कामोर्तब

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी रोहित पवार यांनी पदयात्रा काढत शक्तिप्रदर्शन केले. अर्ज भरण्यापूर्वी रोहित पवार यांनी कर्जतचे ग्रामदैवत गोधड महाराजांचे दर्शन घेतले. त्यानंतर अक्काबाई मंदिर ते कर्जत तहसील कार्यालयापर्यंत पदयात्रा काढत त्यांनी अर्ज दाखल केला. या पदयात्रेत मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. तर, गेल्या वर्षभरापासून रोहित पवार या मतदार संघामध्ये काम करत आहे. मतदार संघातील जनतेंच्या भेटीगाठी घेत आहेत. 

NCPच्या दुसऱ्या यादीत पंकज भुजबळ, बबनदादा शिंदेंसह २० जणांना संधी

दरम्यान, 'या मतदार संघातील लोकांना विकासापासून वंचित ठेवले आहे. त्यांच्याविरोधात मी लढत आहे. पुढचा व्यक्ती कितीही तगडा असता तरी आपण किती कष्ट घेतो. लोकांना किती विश्वास संपादन करतो हे महत्वाचे आहे', असे मत रोहित पवार यांनी यावेळी व्यक्त केले. तसंच पिण्याचा पाण्याचा, बेरोजगारीचा प्रश्न सोडवून या तालुक्याचा विकास करणे हा माझा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. 

आदित्यला आशीर्वाद देणाऱ्यांचा ऋणी, उद्धव ठाकरेंचे 'मनसे' आभार