पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शरद पवारांचे नातू रोहित पवारांची संपत्ती ६५ कोटी

रोहित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. ते कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.  उमेदवारी अर्जात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात रोहित यांनी आपल्या संपत्तीचा तपशील जाहीर केला आहे. त्यांची एकूण संपत्ती ही ६५. २७ कोटींच्या घरात आहे. 

आदित्य ठाकरे 'कोट्यधीश', जाणून घ्या संपत्ती

रोहित पवार  आणि त्यांच्या कुटुंबीयांची २६.३९ कोटींची जंगम मालमत्ता  आहे. त्यातील १८. ४० कोटींच्या मालमत्तेवर त्यांचा तर ७.२८ कोटींच्या मालमत्तेवर पत्नी कुंतीचा हक्क आहे असं त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हणलं आहे.  जंगम मालमत्तेपैकी ७० लाख १० हजारांचा  हिंदू अविभक्त कुटुंबाचा हिश्शा असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. 

'शरद पवार माझ्याबद्दल चुकीची माहिती पसरवताहेत'

रोहित यांची ३८.८७ कोटींची स्थावर मालमत्ता आहे. यातील ३३. ०८ कोटींची मालमत्ता त्यांच्या नावे तर १.८० कोटींची मालमत्ता ही पत्नीच्या नावे आहे. ३.९८ कोटी हे हिंदू अविभक्त कुटुंबातील हिश्श्याचा भाग हे तर उर्वरित स्थावर मालमत्ता ही मुलांच्या मालकीची आहे. स्थावर मालमत्तेत ४.९४ कोटींच्या वडिलोपार्जित  मालमत्तेचा समावेश असून ती रोहित आणि त्यांच्या पत्नीच्या मालकीची आहे. 

रोहित पवार यांची इतर संपत्ती 
-  ३.७६ लाखांची रोकड
- ११.२१ लाखांचे सोने
- १.६८ लाखांचे  हिरे
- २८.९१ लाखांची महागडी घड्याळे
- ७८. ५६ लाखांची शेतजमीन

वरळीतून आदित्य ठाकरेंविरोधात अभिजीत बिचुकले निवडणुकीच्या रिंगणात

३. ७४ कोटींचं कर्ज असल्याचं  रोहित पवार यांनी म्हटलं आहे, व्यवसाय आणि शेती हे उत्पन्नाचं प्रमुख स्त्रोत असल्याचं रोहित यांनी नमूद केलं आहे.