पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा उद्यापासून प्रचार दौरा

शरद पवार (TWITTER)

विधानसभा निवडणुकीला आता अवघे काही दिवस राहिले आहेत. सर्वच पक्षांकडून निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु आहे. सर्व उमेदवारांचे अर्ज दाखल झाल्यानंतर आता प्रचार सभांना सुरुवात झाली आहे.  दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या प्रचार दौऱ्यांना उद्यापासून सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जाऊन शरद पवार प्रचार दौरा करणार आहेत. 

आरेमधील वृक्षतोडीला सुप्रीम कोर्टाची तूर्त स्थगिती

८ ऑक्टोबर रोजी शरद पवार अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर आणि जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथे प्रचार दौरा करणार आहेत. ९ ऑक्टोबरला अकोला जिल्ह्यातील बाळापूर आणि वाशिम जिल्ह्यातील मानोरा-कारंजा येथे प्रचार दौरा करणार आहेत. तर १० ऑक्टोबर रोजी हिंगणघाट, बुटीबोरी-हिंगणा, काटोल या मतदार संघामध्ये शरद पवारांचा प्रचार दौरा होणार आहे. 

इराणच्या प्रसिद्ध इन्स्टाग्राम सेलिब्रिटीला अटक