पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'भाजपचे संकल्पपत्र म्हणेज निव्वळ गाजरांचा पाऊस'

खासदार सुप्रिया सुळे

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मंगळवारी संकल्पपत्र जाहीर केले. भाजपच्या या संकल्पपत्रावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. 'भाजपचे संकल्पपत्र म्हणेज निव्वळ गाजरांचा पाऊस', असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तसंच, संकल्पपत्रात स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची शिफारस करणार असल्याचे भाजपने म्हटले आहे. यावर सुध्दा त्यांनी टीका केली आहे. निवडणुका आल्यावरच भाजपला भारतरत्न का आठवला? असा सवाल त्यांनी केला आहे. 

रामजन्मभूमी प्रकरणी सुनावणीचा आज अंतिम दिवस, काय होणार कोर्टात?

दरम्यान, भाजपने भारतरत्न पुरस्कारासाठी शिफारस करणार असल्याचे सांगितले. पण आम्ही गेल्या २ ते ३ वर्षापासून लोकसभेमध्ये ही मागणी ही मागणी करत आहोत. त्यावेळी भाजपचेच सरकार होते. मग निवडणुका आल्यावर यांना भारतरत्न पुरस्कार का आठवला? असा सवाल त्यांनी विचारला आहे. 

रामजन्मभूमी प्रकरणी सुनावणीचा आज अंतिम दिवस, काय होणार

दिल्लीतील भाजपचे अनेक दिग्गज नेते विधानसभा निवडणूक प्रचारासाठी महाराष्ट्रात येत आहेत. यावरुन देखील सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. 'महाराष्ट्रात जर तुमचं इतकं चांगलं काम असेल आणि पैलवान तयार असतील तर दिल्लीवरुन मॉनिटर कशाला बोलवावे लागतात', असा सवाल देखील त्यांनी विचारला आहे. 

विरारमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून चिमुकलीचा मृत्यू