पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'महाराजांच्या नावाने सरकारने फसवी कर्जमाफी योजना काढली'

खासदार अमोल कोल्हे

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन पाप करण्याचे काम या सरकारने केले असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे. भाजप-शिवसेना सरकारने ५ वर्षांपूर्वी सत्तेवर येताना शिवाजी महाराजांचे नाव घेऊन पारदर्शी कारभार करणार असल्याचे सांगितले. शिवाजी महाराजांच्या नावाने भाजप-शिवसेना सरकारने फसवी कर्जमाफी योजना काढली असल्याचा आरोप अमोल कोल्हे यांनी केला आहे. अहमदनगरच्या राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे राष्ट्रवादीच्या उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेत त्यांनी ही टीका केली आहे. 

'खरा पैलवान कोण हे २४ तारखेला जनता दाखवेल'

'या सरकारने संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या शिवाजी महाराजांच्या स्मारकाची विटसुध्दा रचली नाही. गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा ४ हजार कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आला. मात्र महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची वीटसुद्धा रचली जात नाही. मग महाराष्ट्राला सह्याद्रीला आणि मराठी मातीला असा प्रश्न पडतो की महाराजांच्या मावळ्यांच्या धमन्यांमधील रक्त गोठले की काय की संवेदना बधीर झाल्या? जे सरकार शिवाजी महाराजांचा अपमान करू शकते ते सरकार सत्तेत कसे राहू शकते असा सवाल अमोल कोल्हे यांनी यावेळी विचारला आहे. 

जगात सर्वांधिक सुखी मुसलमान भारतात, कारण..: मोहन भागवत

दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन देखील अमोल कोल्हे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.  'सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करताना ऐतिहासिक कर्जमाफी करण्याचे घोषित केले. नंतर तत्वतः, निकषांसहित, अभ्यास करून निर्णय, आणि प्रत्यक्ष कर्जमाफी करतांना शिवसेना-भाजप सरकारने ६६ अटी टाकल्या आणि फसवी कर्जमाफी करून शेतकर्‍यांची घोर निराशा केली असल्याची टीका अमोल कोल्हे यांनी केली आहे. 

'भारतीय अर्थव्यवस्था एका व्यक्तीच्या मर्जीवर चालू शकत नाही'