पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बेपत्ता आमदार म्हणतात, आम्ही सुखरुप आणि पवारसाहेबांबरोबरच

आमदार दौलत दरोडा आणि नितीन पवार

अजित पवार यांच्याबरोबर शनिवारी राजभवनवर दिसलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन बेपत्ता आमदार आता समोर आले आहेत. आम्ही सुखरुप असून आमची काळजी घेऊ नका. शरद पवार आणि अजित पवार जो काही निर्णय देतील तो आम्हाला मान्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अजित पवारांनी चूक मान्य करावीः नवाब मलिक 

शहापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दौलत दरोडा आणि कळवणचे आमदार नितीन पवार बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली होती. दरोडा हे सकाळी अजित पवारांच्या शपथविधीसाठी राजभवनावर गेल्यापासून बेपत्ता असल्याची तक्रार माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी पोलिस ठाण्यात दाखल केली होती. तर पवार यांच्या पुत्राने नितीन पवार हे सकाळी राष्ट्रवादीच्या बैठकीला जातो म्हणून गेले, ते परत आले नसल्याचे व त्यांच्याशी संपर्क होत नसल्याचे म्हटले होते. 

याबाबत खुलासा करताना आमदार दरोडा म्हणाले की, मी सुरक्षित आहे. मी घडयाळ्याच्या चिन्हावर निवडून आलो आहे. त्यामुळे पक्ष बदलण्याचा प्रश्नच येत नाही. शरद पवार आणि अजित पवार जो निर्णय घेतील तो मान्य असेल. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे त्यांनी म्हटले.

तर दुसरीकडे कळवणचे आमदार नितीन पवार यांनी म्हटले की, मी माझ्या कुटुंबाला आणि जनतेला विनंती करतो की, त्यांनी माझी चिंता करु नका. मी शरद पवार, अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्याबरोबर आहे. माझ्या मनात दुसरा कोणताच विचार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अजित पवारांसोबत गेलेले आमदार दरोडा, नितीन पवार 'मिसिंग'