पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शरद पवार मुंबईतील निवासस्थानी दाखल; अजित पवारांची घेणार भेट?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार

माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी तडकाफडकी आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुध्दा हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी दाखल झाले आहेत. शुक्रवारी पुण्यातील पूरग्रस्तांची भेट घेण्यासाठी ते पुण्याला गेले होते. दरम्यान, ते मुंबईत आले असून अजित पवार यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. 

'खांदेरी' नौदलाच्या ताफ्यात दाखल; ही आहेत खास वैशिष्ट्ये

दरम्यान, राजीनामा दिल्यापासू अजित पवार कुठे आहेत हे अद्याप माहिती पडले नाही. तसंच गेल्या १७ तासांपासून त्याचा फोन बंद लागत आहे. रात्री उशिरा अजित पवार अहमदनगर येथील अंबालिका कारखान्यावर आले होते. त्यानंतर आता ते मुंबईत असल्याचे सांगितले जात आहे. तसंच अजित पवार आज शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. 

काँग्रेसच्या तिकीट वाटपामध्ये राहुल गांधी लक्ष घालणार नाहीत

अजित पवार यांनी शुक्रवारी अचानक आमदारकीचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची रात्री उशिरा बैठक झाली. मुंबईतील शरद पवार यांच्या  निवासस्थानी राष्ट्रवादीची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार उपस्थित होते. मात्र शरद पवार बैठकिला अनुपस्थित होते. तसंच, रविवार बारामतीमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा होणार होता. मात्र तो रद्द करण्यात आला आहे.

'राजीनामा दिला तरी अजित पवारांवरील कारवाई थांबणार नाही'