पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दीड दिवसांचा गणपती ऐकून होतो, जयंत पाटलांचा फडणवीसांना टोमणा

जयंत पाटील

दीड दिवसांचा गणपती ऐकून होतो आता अनुभव आला. त्या गणपतीचे विसर्जनही पाहिले, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. ट्रायडंट हॉटेलमधील काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी यांच्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते.  

उद्धव बाळासाहेब ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावे, अशी सूचना राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी मांडली. त्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी अनुमोदन दिले. महाराष्ट्र विकास आघाडी अशी नव्या आघाडीची स्थापना झाल्याची घोषणा देखील यावेळी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केली. 

'सगळ्या गोष्टी ठरल्याप्रमाणे; लवकरच दिग्दर्शक कळेल'

मुख्यमंत्री पदावरुन भाजप-सेना यांच्यातील वाद चव्हाट्यावर आल्यानंतर राज्यातील जनतेने राष्ट्रपती राजवट अनुभवली. महायुतीला स्पष्ट बहुमत असताना युती तुटल्याने शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या साथीने नव्या आघाडीच्या साथीने सरकारस्थापनेच्या हालचाली सुरु केल्या. हे तिन्ही पक्ष एकत्रित सत्तास्थापन करण्याच्या उंबरठ्यावर असताना भाजपचे गटनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवारांच्या साथीने शनिवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांनी  देखील यावेळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती.

महाराष्ट्रातून भाजपचा अंत होण्यास सुरुवात: मलिक

पण सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी बहुमत स्पष्ट करण्याचे आदेश दिल्यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत भाजपला धक्का दिला. त्यामुळे सोमवारी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार हाती घेतलेल्या मुख्यमंत्र्यांना दिड दिवसातच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची नामुष्की ओढावली.