पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'कालच्या घटनेनंतर जग सोडून जावं असं वाटतंय'

धनंजय मुंडे

भाजपच्या उमेदवार आणि विद्यमान मंत्री पंकजा मुंडे यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भातला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातील वाद पेटला आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी याप्रकरणी परळीमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी धनंजय मुंडे भावूक झाले. काल झालेला वाद वेदना देणारा असून माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला आहे. बहिण भावाच्या नात्यामध्ये विष कालवण्याचा प्रयत्न केला असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले. 

भारताची POKमध्ये कारवाई; दहशतवादी तळ उद्ध्वस्त, पाकचे ५ सैनिक ठार

यावेळी धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. जे वक्तव्य मी केले नाही त्यावरुन मला बदनाम केले जातेय. मी नातं जपणारा माणूस आहे. बहिण भावाचे नाते रक्ताचे असते. माझ्या भाषणाचा आशय वेगळा होता. माझ्या शब्दाचा अनर्थ कोणी काढला याचा मी शोध घेणार आहे. आजपर्यंत मतांचे राजकारण करणे मला जमले नाही, असे सांगत धनंजय मुंडे यांनी मला खलनायक करण्याचा प्रयत्न केला असल्याचे म्हटले आहे. 

जम्मू-काश्मीरमध्ये पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; दोन जवान शहीद

तसंच, खालच्या पातळीवर जाऊन माझ्या भाषणातून कोणाच्या मनाला लागेल असे मी कधी बोललो नाही. मी आतापर्यंत जे बोललो मला कधी माघार घ्यावी लागली नाही. तसंच खेंद किंवा खंत सुध्दा व्यक्त केली नाही. मात्र काल जे झाले हे अत्यंत खेदजनक आहे. कालच्या घटनेनंतर हे जग सोडून जावे असे मला वाटत होते. ऐवढा मोठा काळा डाग माझ्यावर लावला आहे. ऐवढा अभर्द आरोप फक्त निवडणूक जिंकण्यासाठी होत असेल तर असे राजकारण नको. मी राजकारण सोडून देऊल, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

निवडणूक भरारी पथकाने कारमधून ४ कोटी केले जप्त

दरम्यान, 'ज्याने कोणी बहिण भावाच्या नात्याला डाग लावण्याचा प्रयत्न केला त्याचा शोध घेणार आहे. भाजपमध्ये नवीन आलेले भाऊ बहिण-भावाच्या नात्यात विष कालवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी यावेळी केला. धनंजय मुंडे संपला पाहिजे, राजकारणातून उठला पाहिजे. तसंच मी पृथ्वीवर नसावे असे अनेकांना वाटते. १७ तारखेला मी भाषण केले. दोन दिवसानंतर १९ तारखेला माझ्या भाषणाला एडीट करुन व्हिडिओ व्हायरल केला गेला. माझ्याविरोधात पोलिसांनी कोणतिही तपासणी न करता गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. 

येत्या ४८ तासात राज्यात मेघगर्जनांसह जोरदार पावसाची शक्यता

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ncp leader dhananjay munde clarifies on his controversial statement on his video on pankaja munde