पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'शोले' चित्रपटातील किस्सा सांगत भुजबळांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

छगन भुजबळ

विधानसभेच्या निवडणूक प्रचारसभेतून मी पुन्हा येईन, अशा शब्दांत महायुतीत मुख्यमंत्रीपदाची चुरस नसल्याचे सांगणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांची शिवसेनेने चांगलीच कोंडी केली आहे. शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसल्यामुळे महायुतीला बहुमत मिळूनही सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे. सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अनेक संदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत आहेत. यातीलच एक दाखला देत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. विधानसभा निवडणुकीत यश संपादन न करू शकलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांसाठी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते.   

जय महाराष्ट्र! संजय राऊत यांचा अजित पवारांच्या फोनवर मेसेज        

निवडणूक प्रचारावेळी मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणायचे की, पवार साहेबांची परिस्थिती तर 'शोले' चित्रपटातील जेलरसारखी आहे. 'आधे इधर जाओ, आधे उधर जाओ बाकी पिछे आओ' जनतेनं त्यांना चांगले उत्तर दिले आहे. मुख्यमंत्र्यांची परिस्थिती ही 'शोले' चित्रपटातील गब्बरसारखी झाली आहे. या चित्रपटात गब्बर सिंग विचारतो, "आरे वो सांबा कितने आदमी थे रे" सांबा उत्तर देतो, "सरदार एकही आदमी था शरद पवार" 

'कागदी घोडे नाचवू नका, हेक्टरी २५ हजार शेतकऱ्यांच्या हातात द्या'

पवार साहेबांनी निवडणूक फिरवली असे सांगत त्यांनी आपण विजय झालो नसलो तरी पराभवानंतरही आपल्यात आनंदाचे वातावरण आहे. राष्ट्रवादी पक्ष पुन्हा जोमानं उभारण्यासाठी तयार आहे. निवडणुकीमध्ये हवा असते. लोकसभा निवडणुकीनंतर सर्व हताश झाले होते. शरद पवारांनी राज्याचे चित्र बदलले, असे छगन भुजबळ यावेळी म्हणाले.