पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राष्ट्रवादीत हालचालींना वेग; पवारांच्या घरी नेत्यांची झाली बैठक

राष्ट्रवादीची बैठक पार

माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी अचानक आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांची रात्री उशिरा बैठक झाली. मुंबईतील शरद पवार यांच्या 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी राष्ट्रवादीची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार उपस्थित होते. मात्र शरद पवार बैठकिला अनुपस्थित होते, अशी माहिती समोर येत आहे.

'राजीनामा देण्यापूर्वी अजित पवारांची मुलाशी चर्चा पण माझ्याशी नाही'

अजित पवार यांनी शुक्रवारी अचानक आमदारकीचा राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या कार्यालयात जाऊन त्यांनी स्वत:च्या हस्ताक्षरात राजीनामा सुपूर्त केला. हरिभाऊ बागडे यांनी देखील त्यांचा राजीनामा स्विकारला. विधानसभेची मुदत संपण्यापूर्वीच अजित पवारांनी राजीनामा दिल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. राजीनामा दिल्यापासून अजित पवार यांचा फोन देखील बंद लागत आहे. 

अजित पवार यांचा आमदारकीचा राजीनामा

दरम्यान, अजित पवार यांनी राजीनामा देण्यापूर्वी किंवा दिल्यानंतर माझ्याची चर्चा केली नसल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. राज्य सहकारी बँक प्रकरणी माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याचे कळल्यापासून अजित पवार अस्वस्थ होते. यानंतर त्यांनी त्यांचा मुलगा पार्थ याच्याशी बोलताना राजकारणाचा दर्जा खालावत चालला आहे. आपण राजकारणातून बाहेर पडू. वेगळे काहीतरी करू, असे त्याला सांगितले. कुटुंबप्रमूख म्हणून मला ही माहिती मिळाली असल्याचे पवारांनी सांगितले. 

PM Modi UNGA :आम्ही 'युद्ध' नाही 'बुद्ध' दिले : पंतप्रधान